YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड आयुर्वेद रिसर्च सेंटरचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न

  • Home
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड आयुर्वेद रिसर्च सेंटरचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड आयुर्वेद रिसर्च सेंटरचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड आयुर्वेद रिसर्च सेंटरचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न

भुदरगड तालुक्यातील मुदाळ तिट्टा येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड आयुर्वेद रिसर्च सेंटर व महा आयुर्वेद उपचार, पंचकर्म, मसाज सेंटर या एका नवीन सेवेचा प्रारंभ राधानगरी तालुक्यातील डवरवाडी येथील आयुर्वेदाचार्य नारायण डवर यांच्याहस्ते सोमवारी उद्घाटन व शुभारंभ कार्यक्रम करण्यात आला.

अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्य अध्यक्ष युवराज येडूरे होते. यावेळी रघुनाथ सुतार, शहाजी पाटील,रमेश पाटील, संदीप बोटे, संदीप सरदेसाई महा वनौषधी प्रकल्पाच्या मुख्य अधिकारी रोहिणी पुरी बुवा यांची प्रमुख उपस्थिती होती.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड आयुर्वेद रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आयुर्वेदिक पंचकर्म, मसाज यासंदर्भात डिप्लोमा कोर्स चे प्रथम वर्ष प्रवेश दिले जाणार आहे, तसेच सेंटरच्या माध्यमातून आयुर्वेदिक क्षेत्रातील 59 कोर्सेस उपलब्ध आहेत, तसेच महा आयुर्वेदिक उपचार पंचकर्म मसाज च्या माध्यमातून सर्व स्तरातील रुग्णांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. कोविड संकटकाळ लक्षात घेता ही आयुर्वेदिक विभागाची ओपीडी पूर्णपणे मापक दरामध्ये ठेवण्यात आली असून, खास आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या सेवेसाठी आवश्यक ती व्यवस्थाही करण्यात आली आहे. सध्या आयुर्वेदिक पद्धतीमध्ये रोगाचे मुळासह उच्चाटन करण्याची क्षमता असल्याने ही सुविधा रिसर्च सेंटरच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे संस्थेचे अध्यक्षा डॉ. निवेदिता येडुरे यांनी सांगितले.

यावेळी अमित कोरे, तुकाराम भाकरे, मानसिंग तोरसे, दत्तात्रेय साळुंखे, सुनील कोरे महादेव कापसे, शिवाजी पवार, पंडित साळुंखे, रघुनाथ कुंभार, संजय एकल, नाना शिंदे, तिट्टा येथे सुतार, आदींची उपस्थिती होती. सलोनी खोळांबे  यांनी सूत्रसंचालन केले, पल्लवी पाटील यांनी आभार मानले. सौरभ कांबळे, गजानन साबळे, वर्षा पाटील, अश्विनी कोळी, सविता पाटील, नम्रता खोत,मुस्कान आत्तार, साजिदाखानम मोमीन, स्वप्नाली सुतार,ऋतुजा पाटील आदी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम पार पाडला.

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Events