राज्य पातळीवर न्यायव्यवस्थेचा, कायदा आणि सुव्यवस्था यांचा सतत आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र विभागाची निर्मिती गरजेची
हा विभागाची कार्यकक्षा काय?
राज्याच्या अखत्यारीत असलेल्या विषयांवरच्या कायद्यांचा सतत आढावा घेत राहणे. कालबाह्य कायदे बदलण्याची शिफारस करणे.
कायद्याची भाषा सोपी, सर्वसामान्यांना समजेल अशी बनवणे.
सर्व न्यायालयांचं कामकाज स्थानिक भाषेत होत आहे ना, ह्यावर लक्ष ठेवणे.
राज्याचे कायदेमंडळ, म्हणजेच विधानसभेत बसणारे, निवडून आलेले आमदार, यांच्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकप्रतिनिधींसाठी स्वतंत्र न्यायालयांची व्यवस्था लावणे, आणि निकाल एका वर्षाच्या आत लागेल याची खात्री करून घेणे.
राज्य स्तरावर सर्व कायद्यांचा एक कोष तयार करणे.
सरकारी वकिलांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आणि सरकारी वकिलांची संख्या वाढवण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे, विधी महाविद्यालये यांच्याकडे लक्ष पुरवणे.वेगळ्या प्रकारच्या न्यायालयांची फळी तयार करणे. स्थानिक नागरिकांची अधिक मदत घेऊन छोटे छोटे तंटे तिथल्या तिथे मिटवण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे.
आपला नम्र
युवराज रामचंद्र येडूरे
(महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
भुदरगड,आजरा,राधानगरी विधानसभा मतदारसंघ
www.yuvrajyedure.com
www.mnsblueprint.orgBy: Yuvraj Ramchandra Yedure