YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर गावात रस्त्यावरील खड्ड्यांविषयी मनसे आक्रमक आंदोलन

  • Home
  • राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर गावात रस्त्यावरील खड्ड्यांविषयी मनसे आक्रमक आंदोलन
राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर गावात रस्त्यावरील खड्ड्यांविषयी  मनसे आक्रमक आंदोलन

राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर गावात रस्त्यावरील खड्ड्यांविषयी मनसे आक्रमक आंदोलन

मौजे कपिलेश्वर तालुका राधानगरी येथील मांगेवाडी ते तुरंबे फाटा गावात जाणारा रस्ता प्रजिमा 44 हा पूर्णपणे उघडून गेला आहे, यासंदर्भात उपविभागीय अभियंता सा.बा उपविभाग, राधानगरी यांना लेखी कळवलं असतात, या संदर्भात ठोस पावले प्रशासने उचलली नसल्यामुळे व समाधानकारक लेखी उत्तराच्या माध्यमातून न मिळाल्यामुळे खड्ड्यांविरोधात मनसेचा‘ थाळी - नाद’ व खड्ड्यामध्ये वृक्षारोपण आंदोलनाचा कपिलेश्वर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला, मनसेचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडुरे यांनी रस्त्यावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांत पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकही त्रस्त आहेत. त्यामुळे एखादा अपघात होण्याची भीती मनसेने व्यक्त करत खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी केली. यावेळी आंदोलन स्थळावर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातच वृक्षारोपण करून अनोखे  आंदोलन केले, सदरच्या आंदोलन राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडूरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन नियोजन केले होते , यावेळी ते म्हणाले या मुडदाड प्रशासनाला दखल घेऊन नागरिकांना चांगल्या रस्त्याची सुविधा दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशारा दिला,
     यावेळी उपविभागीय अभियंता सा.बा उपविभाग, राधानगरी अधिकारी म्हणाले सदरचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून चांगल्या पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून देऊ, 
 यावेळी उपस्थितीत राधानगरी शहराध्यक्ष राजेश पाटील, तालुका उपाध्यक्ष उत्तम चव्हाण,रणजीत पाटील, सागर शेळके, प्रवीण मनुगडे, सागर कुंभार, वृषभ आमते, रवींद्र हातकर, राहुल कुंभार, अमृत पाटील, ओंकार पाटील, शहाजी कुंभार, सौरभ कांबळे, लक्ष्मण हातकर, अमित कोरे, गजानन साबळे , आदि उपस्थित होते

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Events