पी एफ आय संघटना यांच्या वरती देशद्रोही गुन्हा दाखल झाले पाहिजे त्या संघटना वर बंदी आली पाहिजे, यासंदर्भात राधानगरीमध्ये निषेध आंदोलन
पुणे येथे एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे, यांच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल झाले पाहिजे त्या संघटना वर बंदी आली पाहिजे, अशी निवेदनाच्या माध्यमातून मागणी राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडूरे यांच्या नेतृत्वाखाली मा. पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले
यावेळी युवराज येडूरे म्हणाले राधानगरी पोलीस ठाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वतीने आपल्या पोलीस प्रशासनास मागणी आहे, तरी याचा तात्काळ विचार करून देशद्रोही गुन्हे नोंद करावेत.
यावेळी घोषणा देऊन पीएफआय संदर्भात निषेध व्यक्त केला यावेळी तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, शहर आणि अध्यक्ष राजेश पाटील, राधानगरी उपाध्यक्ष उत्तम चव्हाण, ऋषभ आमते, राहुल कुंभार, प्रवीण मनुगडे, सागर कुंभार, सागर शेळके, रंणजीत पाटील, अमित कोरे, सौरभ कांबळे, गजानन साबळे, संदेश आरेकर, अमोल कुंभार, सुजित पाटील गावचे नागरिक उपस्थित होतेBy: Yuvraj Ramchandra Yedure