शेणगावकरांची विकास कामात दिशाभूल करणाऱ्या आमदार प्रकाश आबिटकरांचा जाहीर निषेध : युवराज येडूरे
शेणगांव येथे भव्य शुभारंभ व लोकार्पण सोहळा मा.आम. प्रकाशराव आबिटकर मौजे शेणगांव ता . भुदरगड येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक 20 ऑक्टोबर 2022 रोजी शेणगाव येथे संपन्न होत असताना आमदार अबिटकरांना जाहीर कार्यक्रमात अडवलं तर त्यांच्या बंधूला शेणगाव ग्रामस्थांनी जाब शेणगाव ग्रामपंचायत भुदरगड मध्ये रंगला कलगीतुरा
श्रेयवादाचे कार्यक्रम आमदार अबिटकरांना पडले महागात
विद्यमान आमदार मतदार संघात काही ठिकाणी निधी आणि विकास कामाशी कोणताही संबंध नसताना फक्त श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करत फिरत आहेत या संदर्भात राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे मनसे नेते युवराज येडूरे यांनी त्यांना जाहीर कार्यक्रमात अडवून प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी काढता पाय घेतला,यावेळी युवराज येडूरे म्हणाले
शेणगाव हे सुशिक्षित गाव आहे, आणि या गावांमध्ये काम करत असताना ते त्या पद्धतीने काम करणं गरजेचं होतं लोकांची दिशाभूल करून जी कामे झालेलीच नाहीत ती कामे सुद्धा डिजिटल च्या माध्यमातून दैनिकाच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली याचा वरती आवाज उचलण्यासाठी आम्ही त्यांना विरोध केला ,
जल जीवन अंतर्गत पाणीपुरवठा 1 कोटी 60 लाख
सदरची योजना ही राज्य व केंद्र शासनाची असून यामध्ये केंद्रशासन 50 % राज्य शासन 50% या निधी वरती सदरची योजना गाव स्तरावरती जिल्हा परिषद मार्फत राबवली जाते,
श्री.क्षेत्र दत्त मंदिर शेणगांव ' ब ' वर्गात समावेश करण्यात आले आहे असे डिजिटल बॅनर च्या माध्यमातून शेणगावकरांना सांगण्यात येत आहे पण याचा पाठपुरावा शेणगाव ग्रामपंचायत लोकप्रतिनिधींनी करत आहेत या संदर्भातील प्रस्ताव महाविकास आघाडीचे माजी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे केला होता, सदरचा प्रस्ताव प्रलंबित आहे पण कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता प्रमाणपत्र देवस्थान कमिटी किंवा ग्रामपंचायतकडे "ब" वर्गात समावेश झाले, असे पत्र प्राप्त झालेले नाही
शेणगाव येथील वाकोबा पाणंद रस्ता 1.5 किमी या रस्त्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने ठराव द्वारे दिला आहे, पण सदरचं काम हे मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजने अंतर्गत होत असतं आणि यामध्ये प्रशासकीय लोक काम करत असतात पण याचा कोणताही संबंध आमदार फंडाशी येत नाही, तसेच सदर पानंद रस्ता हा शेणगांव ते आकुर्डे पाणंद मंजुरी असताना,नविन वाकोबा पाणंद रस्ता 1.5 किमीपत्र मंजुरी नसताना देखील त्याचं श्रेय लाटण्याचं काम आमदार प्रकाश आबिटकर करत आहेत. पण शेणगावची जनता ही सुशिक्षित आहे याचं भान राहू दे
तसेच त्यांनी बेघरवसाहत , कुंभारवाडा अंतर्गत रस्ते लोकार्पण 7 लाख, ब्राम्हण गल्ली रस्ता लोकार्पण 7 लाख शेणगाव मध्ये आपण ही दोन काम पूर्ण केली आहेत याबद्दल त्यांनी आमदारांचे अभिनंदन देखील केलेBy: Yuvraj Ramchandra Yedure