१)प्रशासकीय इमारतीमध्ये असणाऱ्या नागरिकांसाठी सोय असलेल्या संडास मध्ये पाण्याची चावी गेली सहा महिने पंचायत समितीला उपलब्ध झाली नाही पाण्याच्या चावी ची किंमत किती आहे ? नागरिकांना ज्यावेळी संडास मध्ये जाण्याची वेळ येते त्यावेळी चावी नसेल तर ?२) प्रशासकीय इमारतीमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसवलेले आहे पण त्याच्यामध्ये वेळोवेळी पाणीच भरलं नाही तर नागरिकांना पिण्यासाठी देखील पाणी उपलब्ध त्या ठिकाणी होत नाही हे वेळोवेळी निदर्शनास येत आहे.
३) आणि सगळ्यात महत्त्वाचं भुदरगड पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये बाहेर फायर सिलेंडर लावले आहेत त्याची मुदत चार महिन्यापूर्वी संपली असतानादेखील ते फायर सिलेंडर जसे आहेत तसे चार महिने त्या ठिकाणी भिंतीवरती लावलेले आहेत जर अचानक कोणत्याही प्रकारची आपत्ती इमारती वरती आली तर त्यावेळी प्रशासन जागे होणार का? लोकप्रतिनिधी जागे होणार? नेमकं पंचायत समितीच्या इमारतीमध्ये कशा प्रकारची स्वच्छता कशा प्रकारचे लक्ष या लोकप्रतिनिधींचे व प्रशासनाचा कारभार काय आहे हे यावरून लक्षात येते आहे.
सदर विषयाचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर त्या ठिकाणी त्या सोयी उपलब्ध करून घ्याव्यात अन्यर्थ जन आंदोलन उभे केले जाईल याची नोंद घ्यावी.
By: Yuvraj Ramchandra Yedure