राधानगरी विधानसभा मतदार संघातील नव्या दमाचा नवा युवा शिल्पकार म्हणून भुदरगड तालुक्यातील शेणगाव चे सुपुत्र युवराज रामचंद्र येडूरे यांचे नाव घ्यावे लागेल.जनतेला अनभिज्ञ असेलेले एनजीओ संस्थेतील अगाध ज्ञान आणि या ज्ञानातून निर्माण झालेल्या विकासाच्या नव्या पाऊलवाटा आजच्या तरूण पिढीला नव्याने प्रेरणा देणाऱ्या ठरल्या आहेत.त्या अनुषंगाने युवराज येडूरे यांचे नांव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.सन २०१० सालात एनजीओ संस्था कार्यरत नसताना युवराज येडूरेनी अगदी लहान वयातच या संस्थेत सामाजिक दृष्ट्या प्रवेश केला आणि आजघडीला संपुर्ण राज्यभर या संस्थांचे जाळे विनले. आज याच महा एनजीओ डेवलपमेंट असोसिएशनचे युवरा़ज येडूरे गेले सलग १० वर्षे राज्याध्यक्ष आहेत.यावरून युवराज येडूरे यांच्या अफाट व्यक्तीमत्वाची कल्पना आली असेल.
युवराज येडूरे म्हटले की, समोर येतो ते सेवाभावी चेहरा.अगदी शेलकी अंगकाठी, सडपातळ, शांत संयमी माणूस.क्वचितच विधायक कामासाठी चढणारा आवाज, समोरच्याचे सारे ऐकूण घेवून शांतपणे बोलण्याची लकब, बोलण्यातला विश्वास, शब्दातील गोडवा आणि व्यक्तीमत्वाची झाकपाक, संशोधनाची वृत्ती, समाजसेवेला पुर्णवेळ वाहून घेतलेल्या या व्यक्तीमत्वाचे कौतुक करावे तेवढ पुरेच आहे.
शासनाच्या कामकाजातील माहिती उमेदीच्या काळातच युवराज येडूरे नी चांगली समजावून घेतली आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून लोकापर्यंत पोहोचवली हे त्यांचे विशेष आहे. आजघडीला घरबसल्या अनेक तरूण तरूणींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्याचे महान कार्य युवराज येडूरेनी केले आहेत त्याची तुलना कशाशी होवू शकत नाही.महिला सक्ष्मीकरणाची अनेक कामे ते करत आलेत.आपल्या महा महिला बचतगट निधी बँक लि च्या माध्यमातून मोठी शक्ती त्यांनी महाराष्ट्रभर तसेच राधानगरी मतदार संघात त्यांनी उभी केली आहे. चार तालुक्याच्या मुदाळतिट्टा येथील त्यांचे कार्यालय विकासाचे मुद्दे घेवून चारही तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. दिवसेंदिवस युवराज येडूरे यांच्या कार्याची व्याप्ती वाढत आहे.त्यांचे मुदाळतिट्टा येथील प्रशस्त व भव्य तीन मजली कार्यालय त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू बनले आहे.शैक्षणिक, क्रिडा, कला, सास्कृतिक, आरोग्य, विश्वस्थ व्यवस्थापन , धर्मादाय अशी अनेक कामकाज, आपत्तीकालीन व्यवस्थापन , नुकसानभरपाई अशी एक ना अनेक माध्यमातून काम करत आहेत ते पडत्या काळात अनेक कुटुंब, व्यक्ती, समजाजाची धडाधड कामे करण्यात ते तरबेज झाले आहेत.शासनाच्या विविध सेवा सवलती,तसेच विकासाच्या नवनविन संकल्पना युवराज येडूरे यांना चांगल्याच माहिती आहेत. आजच्या समाजाच्या तळागाळातील अनेक तरूणतरूणींना, महिला पुरूषांना ते सक्षमपणे उभा करत आहेत. माणसं घडवत आहेत. विकास कामांचा चौफेर धडाका त्यांनी सुरु ठेवला आहे. आपत्कालीन काळातील त्यांचे योगदान आजच्या व भविष्यातील समाजाला विसरून चालणार नाही.आधुनिक पद्धतीचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे मतदारसंघातील प्रश्न मेल द्वारे राज्य-केंद्र शासनापर्यंत पोचवून त्यांचा पाठपुरावा करून तो मार्गी लावण्याचा काम युवराज येडूरे यांच्या माध्यमातून राधानगरी विधानसभा मतदार संघाला एक नवा आधुनिक चेहरा मिळाला आहे.येणाऱ्या काळात मतदारसंघाचा आधुनिक चेहरामोहरा बदलून टाकण्याची धमकी युवराज यांच्या मध्ये दिसून येत आहे,
कोणत्याही संकटाला न घाबरता त्या संकटाला तोंड देऊन त्याच्यावर पाय ठेवून उभा राहणारा हा राधानगरी विधानसभा मतदार संघातील एक जनसामान्यांमध्ये आधार असणारा एक धाडसी युवक म्हणावा लागेल, अन्याय दिसेल तिथे आवाज चडवणारा जिथे चुकीचा आहे तिथे चुकीचा म्हणणारा जिथे चांगलं घडतय तिथं अभिनंदन करणारा असा हा राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा युवा नेता तयार झाला आहे
याच बरोबर युवराज येडूरेनी यावेळी पर्यावरणीय कामासाठी झोकून घेतले आहे.आजच्या जगाची गरज त्यांनी ओळखली आहे. राज्याला भुषणावर ठरेल असा महा वनौषधी प्रकल्प ते साकारत आहेत.जैव विविधता टिकवण्यासाठी त्यांनी धडपड सुरु केली आहे.युवराज येडूरेंनी आपल्या कर्तृत्वातून शासन निर्णयात समाजोपयोगी असे अनेक बदल करून घेतले.विमा संरक्षणाची अनेक माध्यमे ते हाताळत आले आहेत.लोकांना त्यांचा फायदे देत आले आहेत.जैवविविधतेसंदर्भात त्यांची मोठ्या प्रमाणात जागृती सुरु आहे. आणि याच माध्यमातून राधानगरी विधानसभा मतदार संघामध्ये भविष्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरण हा विषय घेऊन पर्यटनाच्या माध्यमातून युवकांना रोजगार निर्मिती करून देण्याचा ध्यास युवराज येडूरे यांनी घेतला आहे तसेच राष्ट्रीय विमा जनजागृती अभियान च्या माध्यमातून सामान्य जनतेला अडीअडचणी मध्ये त्यांना हातभार मिळावा यासाठी विमा संदर्भात जनजागृती ते चालवत आहेत.ई ऑनलाईन केद्राच्या माध्यमातून राज्यात २२०० केंद्र् स्थापून लोकांना लैकिकार्थाने त्याचा फायदा ते देत आले आहेत शिवाय महा व्यवसाय शिक्षण डिजिटल ऑनलाईन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून राज्याच ३६८ केंद्रे स्थापन करण्याचे बहुआयामी काम युवराज येडूरे नी केले आहे.सध्या ते राधानगरी विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास आराखडा ते तयार करत आहेत.नव्याने सुरु करत असलेल्या महा औषधी निर्मिती , संवर्धन , संशोधन, पर्यटन व उपचार पिरशिकिषण केंद्राच्या माध्यमातून सुमारे २५० लोकांना ते रोजगार देत आहेत.
युवराज येडूरे यांच्याकडे विकास कामांची जाण आहे तर कामांचीही जाण आहे.प्रश्न उपस्थीत करून तो सोडवण्याची क्षमता तयार करून तो मार्गी लावण्याचे महत्वपूर्ण काम युवराज येडूरे करत आहेत. युवराज येडूरे ना मनसे चे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे चांगले पाठबळ आहे.मनसेच्या माध्यमातून त्यांनी विकास कामांना वाहून घेतले.राधानगरी विधानसभा मतदार संघाचे ते मनसेचे ते गटनेते आहेत.गेल्या वेळची २०१९ ची पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव उमेदवार म्हणून मनसेची आमदारकी त्यांनी लढविली आहे. याच माध्यमातून मतदारसंघातील त्यांचे अनेक प्रतिनिधी व महाराष्ट्र सैनिक होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत स्तरावर मनसेची उमेदवारी लढवणार आहेत. विकासाच्या नव्या जाणीवा, नवी माध्यमे ते राबवणार आहेत. आजच्या जगाच्या नव्या माहितीचा आणि नव्या कर्तृत्वाचा हा नवा शिल्पकार आजच्या समाजाचा नायक बनला आहे.
युवराज येडूरे यांनी आपल्या सुरूवातीच्या काळात स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून लक्षवेधी कामे करत उभारी घेतली.या संस्थेच्या माध्यमातून भुदरगड, राधानगरी, आजरा तालुक्यातील बहुतांश गावातील महिला मुलींना व्यवसाय प्रशिक्षण देवून उभे केले.यातून हजारो महिला अनेक उद्योग व्यवसायात प्रशिक्षित झाल्या.स्वावलंबी झाल्या आज या महिला काही ना काहीतरी उद्योग करत आहेत.तरूण वर्गालाही त्यांनी प्रशिक्षणे दिली आहेत.अनेक प्रकारे तरूणांनाही स्वावलंबी बनवण्याचे त्यांचे धोरण मार्गदर्शक आहे.युवराज येडूरेनी उभा केलेले हे सारे काम स्वराज्य एनजीओ संस्थेचे आहे.त्याचबरोबर मतदार संघाच्या आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून ते करत असलेली सामाजिक आंदोलने व त्या अनुषंगाने जनतेत होत असलेली जागृती लक्षवेधी आहे.राज ठाकरे यांच्या स्वप्नातील जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी ते करत असलेली धडपड कौतुकाची आहे.युवराज येडूरें यांना शेतकरी विकासाची नवनविन संकल्पना राबवायच्या आहेत.शेतकऱ्यांना प्रशिक्षणे देवून त्यांना आर्थिकसदृष्ट्या सक्षम करायचे आहे.शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावायचे आहेत.शेतकऱ्यांच्या सातबारा वरील अडचणी सोडवायच्या आहेत.मनसेच्या माध्यमातून हे सारे आता उभा करायचे आहे.राधानगरी विधानसभा मतदार संघाचा अभुतपुर्व विकास करायचा आहे.यासाठी या नव्या जगाचा नवा युवा शिल्पकार युवराज येडूरे विकासाच्या नव नव्या संकल्पना घेवून समाजाला योगदान देण्यासाठी तत्परतेने उभा राहीला आहे. अशा ह्या व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
पत्रकार सुभाष माने,गारगोटी(३१मे२०२२ रोजी ३३व्या वाढदिवसा निमित्त मा.युवराज येडूरे यांच्या महा एनजीओ कार्यालय मुदाळतिट्टा येथील संपर्क कार्यालयामध्ये शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित आहेत.)
शुभेच्छुक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना,राधानगरी विधानसभा मतदारसंघ, कोल्हापूर जिल्हा
By: Yuvraj Ramchandra Yedure