राधानगरी तालुक्यातील विविध प्रश्नावरून मनसेचे राधानगरी तहसीलदारांना, गटविकास अधिकारी यांना निवेदन व जन आंदोलनाचा इशारा...
रेशनचा अधिकार कायम राहावा, उत्पन्नावर आधारित रेशन कार्ड बंद करू नका, अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करा या व अशा अन्य मागण्यांसाठी मनसेच्या वतीने राधानगरी तहसीलदारांना निवेदन देण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडूरे यांनी केले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र व राज्य सरकारचे अन्न धान्य वितरण प्रणाली बंद करण्याचे धोरण आहे. अन्नसुरक्षा या तत्त्वावर या देशात गोरगरिबांना अन्नधान्य रेशनवर वितरण प्रणाली सुरू होणे गरजेचे आहे. आर्थिक निकषावर रेशन कार्ड बंद करणे, एपीएल व गहू-तांदूळ बंद करणे, घरगुती गॅसचे वाढते दर यामुळे सामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे.
सरकारने केशरी रेशन कार्डवर गहू, तांदूळ व डाळ द्यावी, गॅस सिलिंडरची किंमत 500 रुपये कायम करावी, बायोमेट्रिक पद्धत बंद करावी, अन्नसुरक्षा योजनेचा इष्टांक वाढवा, रेशनमधील भ्रष्टाचार थांबवा.
राधानगरी तालुक्यातील खेडे गावातील लोक राधानगरीमध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये कामासंदर्भात येत असतात पण गेली दीड वर्ष निवासी नायब तहसीलदार नसल्यामुळे लोकांची गैरसाई होत आहे यावर तात्काळ नायब तहसीलदार नियुक्त करून लोकांची कामे मार्गी लावावीत.
मातोश्री पाणंद योजना ही शेतकऱ्यांसाठी असून ही योजना असताना देखील काहीच गावांचे प्रस्ताव सादर करून तर गावातील शेतकऱ्यांची व लोकांची दिशाभूल होत आहे यासाठी प्रत्येक गावामध्ये ज्या ठिकाणी पाणंद रस्त्याची आवश्यकता आहे अशा सर्व पाणंद रस्ते व्हायला पाहिजेत आणि त्याचे प्रस्ताव सादर करण्यासाठी ग्रामपंचायतींना आदेश घ्यावेत. ज्या लोकांना पाणंद रस्त्याची आवश्यकता आहेत अशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संपर्क साधावा, आम्ही राधानगरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय देऊन सदर पाणंद रस्ते मंजूर करून देऊ.
अनेक वर्ष ग्रामीण भागातील मुलांना माध्यमिक व प्राथमिक शिक्षण घेत आहेत पण त्या शिक्षणाबरोबर त्यांना शिक्षण देणारे शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे मुलांची शैक्षणिक नुकसान होत आहे यासाठी राधानगरी तालुक्यातील रिक्त शिक्षक पदे तात्काळ भरावीत. व ग्रामीण भागातील मुलांना न्याय मिळावा.
आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या सदरच्या निवेदनात म्हटल्या आहे यावेळी उपस्थितीत राधानगरी तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, राधानगरी शहराध्यक्ष राजेश पाटील, तालुका उपाध्यक्ष उत्तम चव्हाण,रणजीत पाटील, सागर शेळके, प्रवीण मनुगडे,राहुल, कुंभार, वृषभ आमते, सुजित पाटिल, संदेश अमृत पाटील, ओंकार पाटील, सौरभ कांबळे, अमित कोरे, गजानन साबळे , आदि उपस्थित होते मोठ्या संख्येेन उपस्थित होते.
By: Yuvraj Ramchandra Yedure