देवानी पाठवलेली कलाकार माणसं यांचा सत्कार वेळोवेळी होणे काळाची गरज आहे कारण उतरत्या वयामध्ये हा सत्कार त्यांना जगण्याची उमेद देते.
आज आमच्या शेणगाव गावचे ज्येष्ठ नागरिक श्री रामचंद्र सुतार हे एक नाविन्यपूर्ण कलाकार आहेत. त्यांनी नाटकांमध्ये सोंगी भजनामध्ये गावातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं व कलाकार म्हणून हि काम केलं अगदी माझे वडील देखील सोंगी भजनांमध्ये नाटकांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे .
आज योगायोगाने ते तब्येत दाखवण्यासाठी बिद्री येथे दवाखान्यांमध्ये आले होते त्याच दरम्याने मुदाळ येथे गाडीवरून जात असताना त्यांनी आपल्या मुलग्याला म्हणजेच नंदू सुतार यांना विचारलं की हे काय आहे त्यावेळी त्यांच्या मुलांनी त्यांना सांगितलं की हे आपल्या गावच्या युवराजचे ऑफिस आहे असं म्हटल्यानंतर कलाकार सुतार म्हणाले की माझ्या मित्राच्या मुलग्याचे ऑफिस आहे. म्हटल्यानंतर भेट घ्यायची इच्छा त्यांची झाली त्यांनी आज ऑफिसला भेट दिली.
अचानक ऑफिसमध्ये त्यांना आलेलं पाहून खूप बरं वाटलं कारण माझ्या वडिलांचे मित्र आज जरी वयस्कर आणि तब्येतीने आजारी जरी असले तरी त्यांच्या मधला कलाकार माणूस आजही ताजातवाना व दिमाखात छान दिसतो
यावेळी खूप काही माझ्या वडिलांच्या आठवणी आणि त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले किस्से त्याच्या वरती चर्चा झाली काही गावा संदर्भात गोष्टी वरती पण चर्चा झाली त्यांनी सांगितले की पुढे गावातील ही कला जोपासणे काळाची गरज आहे आणि ती युवा पिढीने जोपासावी ही त्यांची खूप इच्छा आहे. त्यांना या वेळी मी सांगितलं की जितका काही मला करता येईल तितका मी प्रयत्न माझ्यापरीने मी करेन
खरंच मी खूप भाग्यवान आहे ज्या गावांमध्ये मी जन्म घेतला त्या गावांमध्ये असे महान ज्येष्ठ कलाकार आमच्या गावामध्ये आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे आणि अशा कलाकार लोकांचा नेहमी आपल्या सर्वांच्या माध्यमातून सन्मान व्हावा हीच सदिच्छा आणि गावच्या नव्या कलाकारांच्या माध्यमातून शिकला उंच शिखरावरती जावो हीच इच्छा...
त्यांचा आज माझ्या कार्यालय मध्ये त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांना गौरव प्रमाणपत्र देऊन त्यांचा आम्ही आज सत्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.By: Yuvraj Ramchandra Yedure