YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

काय फसवणूक... काय दोन नंबरचे पैसे... काय मोकाट आरोपी..समदं राधानगरीमध्ये ओके हाय

  • Home
  • काय फसवणूक... काय दोन नंबरचे पैसे... काय मोकाट आरोपी..समदं राधानगरीमध्ये ओके हाय
काय फसवणूक... काय दोन नंबरचे पैसे... काय मोकाट आरोपी..समदं राधानगरीमध्ये ओके हाय

काय फसवणूक... काय दोन नंबरचे पैसे... काय मोकाट आरोपी..समदं राधानगरीमध्ये ओके हाय

काहीही दोन नंबर करायचं असेल तर राधानगरी तालुक्यात या. गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असल्याची तक्रार ऐकताच पोलिसांनी ज्यांनी फसवणूक केली त्याच्याकडूनच 63 लाख रुपये घेतले असल्याची तक्रार. यावरून इथे कोणाची फसवणूक झाली तर त्याला न्याय देण्याऐवजी मला काय मिळणार अशीच अवस्था एका प्रकरणात काही पोलिसांची झाली आहे. अर्थात काय फसवणूक... काय दोन नंबरचे पैसे... काय मोकाट आरोपी..समदं राधानगरीमध्ये ओके हाय. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
नुकतेच एका प्रकरणात या तालुक्यातील काही नागरिकांना कोट्यवधी रुपयाचा चुना याच तालुक्यातील एजंट यांनी लावला. संशयित आरोपी याविषयी तक्रार असून सुद्धा पोलीस त्यांना पकडत नाहीत. त्यामुळे राधानगरी तालुक्यात दोन नंबर करायचा असेल तर बिनधास्त या संरक्षण करणारे रक्षण देतील अशी चर्चा सुरू आहे.
राधानगरीतील काही पोलीस आणि एक तथाकथित आर्थिक उलाढाल करणाऱ्यामध्ये आवाज इंडियाच्या बातम्यामुळे कमालीची चर्चा सुरु झाली. एक गंभीर प्रकरणाला वाचा फुटली. 

 या सगळ्या आर्थिक उलाढाल प्रकरणात रेश्मा नदाफ या केंद्र स्थानी आहेत. नदाफ यांनी बजरंग पाटील, कृष्णा यादव, विजयसिंह घाटगे आदी पोलीस कर्मचारी यांनी पकडले. पाटील, यादव, घाटगे व पोलीस निरीक्षक ए.एस.कोळी यांच्या विरोधात 63 लाख रुपये घेतले असल्याची तक्रार नोंद केली आहे.मुळात जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कडे तक्रार दाखल झाल्या पासून या प्रकरणी रोज नवी माहिती समोर येत आहे.

रेश्मा नदाफ व याचे राधानगरीमधील एजंट हे कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून बिनधास्त पणे फिरत आहेत. यातीलच चव्हाण याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या कडील तब्बल 63 लाख रुपये काढून घेऊन आणखीन 3 कोटी रुपयांची मागणी पोलिसांनी केल्याचा तक्रार केली गेली आहे. 

रेश्मा नदाफ हिने या प्रकरणी उच्च न्यायालयात जामिनीसाठी अर्ज केला असला तरी, नुसता न्यायालयीन बाब म्हणून या प्रकरणी बघून चालणार नाही. कारण वरकरणी तीन चार कोटींचा हा प्रकार नसून अजून यात खूप मोठी उलाढाल झाली असल्याचे जागोजागी बोलले जात आहे. यातील नदाफ ,चव्हाण, कुंभार आशा लोकांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाई त्याच वेळी का केली नाही ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य विचारू लागले आहेत. मुळात या आर्थिक उलाढालीमध्ये नक्की किती आणि कोणाची फसवणूक झाली? कोणी किती रकमेवर डल्ला मारला ? खरच काही पोलिसांनी यात सुरवातीपासून कोणती आणि कशी भूमिका घेतली हे एकदा उघड झाले पाहिजे आहे.

  नदाफ आणि त्याचे त्याचे एजंट काही पोलिसांना कसे काय सापडत नाहीत या मागे कोणते वजनदार करण दडलेले आहे का याची उकल वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी करावी अशी मागणी सर्व सामन्यातून होत आहे. यातील तक्रारदार हा जमिनीसाठी उच्च न्यायालयात जातोय, तर संबंधित पोलिस अधिकारी काही दिवस रजेवर जातात याचे कोड काही केल्या सुटत नाही.

यातील तक्रादार याला पोलिसांनी तक्रारी संदर्भात पोलीस ठाण्यात हजर होण्यास नोटीस बजावली आहे. तक्रार दाखल होण्याआधी तक्रारदार आणि नदाफ , कुंभार आशा लोकांवर गुन्हा दाखल असताना इतके दिवस पोलीस त्यांना जामिनावर बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा याची वाट बघत होते की काय असा सवाल सर्व सामन्यातून विचारला जातोय.
 या सगळ्या आर्थिक उलाढाल मध्ये शेकडो गरिबांचे पैसे नक्की कोणाकडे किती आहेत याचा शोध लागणार काय. त्यांना परत पैसे मिळणार काय या सर्व बाबी निपक्षपणे तपासणीवर असणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs