YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

नागणवाडी प्रकल्प कोणी मंजूर करून आणला हे महत्त्वाचं नसून जनतेच्या पैशातूनच जनतेला पाणी मिळालं हे खूप महत्त्वाचा आहे :- युवराज येडूरे

  • Home
  • नागणवाडी प्रकल्प कोणी मंजूर करून आणला हे महत्त्वाचं नसून जनतेच्या पैशातूनच जनतेला पाणी मिळालं हे खूप महत्त्वाचा आहे :- युवराज येडूरे
नागणवाडी प्रकल्प कोणी मंजूर करून आणला हे महत्त्वाचं नसून जनतेच्या पैशातूनच जनतेला पाणी मिळालं हे खूप महत्त्वाचा आहे :- युवराज येडूरे

नागणवाडी प्रकल्प कोणी मंजूर करून आणला हे महत्त्वाचं नसून जनतेच्या पैशातूनच जनतेला पाणी मिळालं हे खूप महत्त्वाचा आहे :- युवराज येडूरे

भुदरगड तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे, या राजकारणाचा मुद्दा सुद्धा चर्चेमध्ये आहे, तो म्हणजे या नागणवाडी प्रकल्पाच्या पाणी पूजन हे पाणी पूजन सध्या विद्यमान आमदारांनी केलं आणि त्याचं श्रेय लाटण्याचा देखील प्रयत्न केला पण हा प्रयत्न हाणून पाडण्याचं काम देखील माजी आमदारांनी केलं आता यामध्ये कोणत्या पक्षाने आणि कोणत्या लोकप्रतिनिधीने किती काम केलं किती पाठपुरावा केला यासंबंधी संशोधन करणं खूप गरजेचं आहे, आणि हे संशोधन करत असताना दोन्हीही बाजूने त्यांनी आपण काय पाठपुरावा केला हे जनतेसमोर ठेवावे लागेल तरच सुशिक्षित लोकांना कळेल की नेमका पाठपुरावा कोणी केला आणि हे नेमकं पाणी पूजन करण्याचं कारण काय आणि  पाणी पूजनाने नेमकं काय साध्य करायचं आहे, कारण जनतेचे प्रश्न जनतेचे काम करणं हे लोकप्रतिनिधीत कर्तव्य आहे, आणि जनतेने त्यांना आपलं काम करण्यासाठी निवडून दिले आहे, हे त्यांना मान्य करावे लागेल आज असं झाले की जनतेवरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न विद्यमान आमदारांच्याकडे केला जातोय  विद्यमान आमदार हे शिवसेनेचे होते आणि सध्या ते शिंदे गटाकडे आहेत पण यामध्ये काही महिन्यापूर्वी शिवसेना व राष्ट्रवादी हे सरकार महाराष्ट्रामध्ये होतं आणि आता शिंदे सरकार आहे पण हे श्रेय लाटण्याचं काम विद्यमान आमदारांनी केला आहे, पण याच्यामध्ये तितकाच वाटा राष्ट्रवादी पक्षाचा देखील आहे, तसेच आपले माजी आमदार देखील यांनी जो पाठपुरावा केला यांनाही ते श्रेय गेलं पाहिजे मला या माध्यमातून एकच सांगायचं आहे माजी आमदार असतील किंवा पक्ष असेल किंवा विद्यमान आमदार असतील या सर्वांनी पाठपुरावा केला म्हणूनच हे शक्य झालं जर तो आवाज माजी आमदार आणि त्यावेळी उठवला किंवा विधानसभेमध्ये तो प्रस्ताव मांडला नसता तर ते आज शक्य झालं नसतं त्यामुळे विद्यमान आमदारांनी २२वर्ष प्रलंबित प्रश्न मार्गी लावला जे म्हणत आहेत ते सार्थ चुकीचा आहे, आणि हे जनतेला कळतं पण हे विद्यमान आमदारांना कसं कळत नाही आणि कळत असेल तर ते नाईलाजाने हे करत आहेत, हे जनतेला दिसत आहे कारण त्यांनी आपल्यावर असलेला डाग मिटवण्याचा काम ते करत आहेत पण तो डाग निघून जाणं हे मला तरी शक्य वाटत नाही त्यामुळे जे काही आहे जे प्रामाणिकपणे तुम्ही करत आहात ते जनतेसमोर मांडायला तुम्हाला काही हरकत नाही नक्कीच तुम्ही खरे असाल तर तुम्हाला दिखाऊपणा करायची काहीही गरज नाही, विनाकारण जे तुम्ही पाच वर्षांमध्ये करू शकला नाहीत असे इव्हेंट तुम्ही या पंधरा दिवसांमध्ये करत आहात याचाच अर्थ तुम्ही काहीतरी लपवताय आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय हे वेळोवेळी मी आपल्या निदर्शनास आणून देत आहे, तरी राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने अशा विद्यमान आमदारांच्या या इव्हेंटला कोणतीही साथ किंवा दाद न देता खरं खोटं काय आहे हे पाहूनच विश्वास ठेवावा ही आपणा सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती करत आहे,
या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की या नागनवाडी प्रकल्पांमध्ये अनेक माजी आमदारांचा अनेक लोकप्रतिनिधींचा व तेथील जनतेचा व शेतकरी वर्गालाच श्रेय जात याचं श्रेय हिरावून घेऊन डाग मिटवता येऊ शकत नाही, आणि हेच अंतिम सत्य आहे.

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs