YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

पाण्यासाठी वणवण चिक्केवाडी ग्रामस्थांची दमछाक

  • Home
  • पाण्यासाठी वणवण चिक्केवाडी ग्रामस्थांची दमछाक
पाण्यासाठी वणवण चिक्केवाडी ग्रामस्थांची दमछाक

पाण्यासाठी वणवण चिक्केवाडी ग्रामस्थांची दमछाक

प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची गरज : सायफन पद्धतीने पाणीपुरवठा करावा : इतर सुविधा देण्याचीही नागरिकांची मागणी

 भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्याच्या पायथ्याशी वसलेले चिक्केवाडी हे छोटस गाव . गेली पंधराहून अधिक दिवस पाण्यासाठी तळमळत आहे . गावाला होणारा नैसर्गिक पाणी पुरवठा बंद झाल्याने चिक्केवाडी गावातील महिलांना पाण्यासाठी जंगलात मटकावे लागत आहे . ग्रामपंचायत जवळ नाही तसेच प्रशासनास कोणताही संपर्क होत नसल्याने तक्रार कुठे करायची हा प्रश्न येथील लोकांसमोर आहे . प्रशासनाने ताबडतोब सायफन पद्धतीने होणारा पाणीपुरवठा सुरू करावा , अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे . फक्त मतदानापुरते येणाऱ्या राजकीय नेते व कार्यकर्ते यांच्या बाबत तीव्र संताप व्यक्त केला . आदिवासी सारखे जीवन जगणाऱ्या या लोकांना सुविधा कधी मिळणार असा सवाल निर्माण होत आहे . राज्यात कमी मतदान असणार चिक्केवाडी गाव म्हणून त्याची नोंद आहे . तांब्याचीवाडी , मटवाडी , चिक्केवाडी अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे . या ग्रामपंचायतीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर ' चिक्केवाडी , वाहतुकीची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही जंगलातून पायपीठ करत ग्रामपंचायती कार्यालयात यावे लागते . या गावांमध्ये शिंदे आणि लाड अशी एकूण सहा कुटुंब राहतात . गावाला जंगलातून सायफन पद्धतीने पाणी पुरवठा केला जातो . परंतु पंधरा दिवसापूर्वी पासून जंगलातील पाण्याची पातळी कमी झाली . तसेच पाण्याच्या मुख्य स्त्रोत जवळ पाइप फुटल्याने गावाचा पाणीपुरवठा बंद झाला . पाण्याची दुसरी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही प्रशासनाने अनेक वर्षापूर्वी कूपनलिका मारलेली आहे . ती बंद अवस्थेत आहे . पंचायत समितीच्या माध्यमातून पंधरा ते वीस वर्षांपूर्वी पाण्याची समस्या ओळखून विहीर मारली होती . परंतु विहिरीला नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत नसल्याने पावसाचे पाणी फक्त साचून राहते . आज गेले कित्येक दिवस साचून राहिलेले पावसाचे पाणी पिण्यासाठी वापरण्या शिवाय या लोकांना दुसरा पर्याय राहिला नाही . गावाच्या चारी बाजूने जंगल असून या जंगलातून पाण्यासाठी महिलांना खूप लांबवर भटकावे लागत आहे . प्रशासनानेही या गावाकडे दुर्लक्ष केलं आहे . शिक्षणाची , आरोग्याची कोणती सुविधा उपलब्ध नसल्याने तरुण मुलं - मुली शिक्षण , व्यवसायानिमित्त शहराच्या ठिकाणी गेली आहेत . यामुळे वयोवृद्ध माणसा व्यतिरिक्त या गावात कोणीही पहावयास मिळत नाही .

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs