मौजे मुदाळ तिट्टा तालुका:- भुदरगड येथील मुदाळ तिट्टा ते गारगोटी या मार्गावरील रस्त्याची चाळण झाली आहे. सदर रस्ता हा नवीन करून देखील अशा प्रकारे रस्ता खराब होतो याची दखल आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन सदर कॉन्ट्रॅक्टदारावरती कारवाई करावी, गेली अनेक महिने जनतेने खड्ड्यांचा हा त्रास नागरिकांनी भोगला आहे, आणि सध्या भोगत देखील आहेत, याच्यावर आपण काय उपाययोजना करणार आहात हा प्रश्नचिन्ह आहे, मात्र आम्ही तुम्हाला एक विनंती करतो की अनेक महिने आम्ही या रस्त्यावरती त्रास भोगला आहे आणि भोगत देखील आहे पण राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी माननीय आमदार प्रकाशराव अबिटकर यांच्या निवासस्थानासमोर देखील अशाच प्रकारे खड्डे पडले आहेत, ते तरी तुम्ही भरून घ्यावेत ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी आहे, आपणास नम्र विनंती आहे, सदर पत्राच्या अनुषंगाने आपण तात्काळ यावर निर्णय घ्यावा अन्यार्थ मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडूरे यांनी निवेदनाद्वारे केला आहे, सदरचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर, तहसीलदार कार्यालय भुदरगड, राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व सार्वजनिक बांधकाम विभाग भुदरगड यांना मेलद्वारे देण्यात आले आहे.
By: Yuvraj Ramchandra Yedure