संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ५२ एस. टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे दि .०४ नोव्हेंबर २०२१ पासून एस.टी. कर्मचारी दुखवटयामध्ये सामील असलेने भुदरगड तालुक्यातील एस.टी. प्रवासी वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच सर्वसामान्य प्रवासी जनता, अंध - अपंग, प्रत्रकार व जेष्ठ नागरिक यांचे अतोनात हाल होत आहेत गेले ४२ दिवस दुखवटा पाळल्या मुळे एस टी प्रवासी वाहतूक ठप्प आहे एस टी कर्मचा - यांची शासनामध्ये विलिणीकरन करावे म्हणून मागणी आहे. ती शासन स्तरावरुन मान्य करुन ताबडतोब प्रवासी वाहतूक सुरु करावी. सदर बंद मुळे खाजगी वाहतूकदारयांचे कडून प्रवाशी जनता व विद्यार्थी पालक यांची अर्थिक पिळवणूक होत आहे. या सर्व बाबींचा विचार करुन शासनस्तरावर योग्य निर्णय व्हावा, ही विनंती
By: Yuvraj Ramchandra Yedure