YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

वाचाल तर वाचाल ...!! जी लोक शिवरायांचा नाव घेऊन आंबेडकरांचा द्वेष करतात, आणि जी लोक आंबेडकरांच नाव घेऊन शिवरायांचा द्वेष करतात..!!

  • Home
  • वाचाल तर वाचाल ...!! जी लोक शिवरायांचा नाव घेऊन आंबेडकरांचा द्वेष करतात, आणि जी लोक आंबेडकरांच नाव घेऊन शिवरायांचा द्वेष करतात..!!
वाचाल तर वाचाल ...!! जी लोक शिवरायांचा नाव घेऊन आंबेडकरांचा द्वेष करतात,  आणि जी लोक आंबेडकरांच नाव घेऊन शिवरायांचा द्वेष करतात..!!

वाचाल तर वाचाल ...!! जी लोक शिवरायांचा नाव घेऊन आंबेडकरांचा द्वेष करतात, आणि जी लोक आंबेडकरांच नाव घेऊन शिवरायांचा द्वेष करतात..!!

वाचाल तर वाचाल ...!!
जी लोक शिवरायांचा नाव घेऊन आंबेडकरांचा द्वेष करतात, 
आणि जी लोक आंबेडकरांच नाव घेऊन शिवरायांचा द्वेष करतात..!!
वास्तवात अशा ह्या दोन्ही प्रकारच्या लोकांना ना शिवराय कळलेले असतात ना आंबेडकर..!!
विकृती प्रत्येक समाजघटकात आहे, फक्त स्वतःच्या विकृती मात्र आपल्या अहंकारामुळे झाकल्या जातात. 
त्यामुळ एखाद्याच्या विकृतीमुळे संपूर्ण समाजाला कधीच निकाली काढू नये...!!
शिवरायांचा इतिहास पाहिला तर लक्षात येते कि "जात" हा फॅक्टर त्यांनी कधी मानलाच नाही, आणि आंबेडकरांनी जातीव्यवस्थेवर तर वाघाच्या पंजासारखे घाव घातलेय..!!
जर ह्या महापुरुषांनी आपल्या उभ्या आयुष्यात जातीयवादाला थारा दिला नाही, तर मग ह्या महापुरुषांना जातीत विभागणारे आपण कोण?
काही जण धर्माच्या-जातीच्या पटलावरून शिवराय व आंबेडकरांचा वारसा सांगतात, 
आणि महापुरुषांना आपल्या स्वतःच्या जातीच्या-धर्माच्या डबक्यात बंदीस्त करून ठेवतात.
माझ्या मते हि अशीच लोक शिवद्रोही-आंबेडकरद्रोही आहेत.
अशा लोकांना एकच सांगू इच्छितो कि बाबांनो तुमच्या धर्माच्या-जातीच्या डबक्याबाहेर खूप मोठे जग आहे, त्यात हि वावरायला शिका. 
खोटा इतिहास कॉपी पेस्ट करण्यापेक्षा खरा इतिहास स्वतः पुस्तके घेऊन वाचा
हा देश घडवण्यात हजारो महापुरुष खर्ची पडलेत..!!
शेकडो संत होऊन गेलेत त्यांना जाती आणि धर्मात विभागण्यापेक्षा त्यांनी शिकवलेल्या शिकवणी अंगिकारा..!!
स्वतःचा, स्वतःच्या समाजाचा सर्वांगीण विकास करा तरच देशाची प्रगति होईल.
जर तुम्हाला शिवरायांचा-आंबेडकरांचा वारसदार व्हायचे असेल तर जातीव्यवस्थेवर घाला घालावा लागेल..!!
अन्यायाविरुद्ध मशाल पेटवावी लागेल, 
उच्च शिक्षित व्हावे लागेल समतेचा जागर पेटवावा लागेल, देश लुटणाऱ्या विरोधात आवाज उठवावा लागेल..!!
तरच तुम्ही खऱ्या अर्थाने ह्या महापुरुषांचे वारसदार..!!
अलबत, जरी तुमचा जात-धर्म वेगळा असला तरी..!!
ज्यावेळी स्वराज्यावर घाव घातला जातो त्यावेळी शिवरायांचा "भगवा" झेंडा मला मला शत्रू विरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो, 
व ज्यावेळी सामाजिक जातीय विषमता भारत मातेला झुकवते तेव्हा जातीय समाज कंटकांविरुद्ध लढण्याची प्रेरणा मला आंबेडकरांचा "निळा" झेंडा देतो.!!
तेव्हा भगवा ही माझा आणि निळा ही माझाच..!!
पण जातीयवाद्यांनी एक लक्षात ठेवाव कि,
ज्याप्रमाणे बापाने गुन्हा केला म्हणून पोरगा गुन्हेगार ठरत नाही, त्याचप्रमाणे बापाने शौर्य गाजविले म्हणून पोरगा पण शूरवीर ठरत नाही.
म्हणून आमचे बाबा, आमचे राजे
करत बसण्यापेक्षा त्यांचा आदर्श घेऊन तसे वागा..!!

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs