महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांना २० सप्टेंबर २०२२ रोजी ठीक १२ वाजता मुधाळ तिट्टा येथे हेल्मेट वाटप केले, विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडूरे यावेळी ते म्हणाले पक्षाचा हा महाराष्ट्र सैनिक जनतेच्या कामासाठी वेळोवेळी बाईक वरून प्रवास करत असतो अशा दरम्यान, रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही हेल्मेटच्या अभावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. याची दक्षता म्हणून आम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांना हेल्मेट वाटप करण्याचा निर्णय घेतला असून आम्ही राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांना हेल्मेट वाटप केले, यापुढे त्यांना संरक्षण देण्याचा काम करणार आहोत, मतदारसंघातील महाराष्ट्र सैनिकांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहणार आहोत. या वेळी रणजीत पाटील, संदीप सरदेसाई, राहुल कुंभार, प्रवीण मनुगडे, गजानन साबळे, सौरभ कांबळे कार्यक्रमासाठी उपस्थितीत
By: Yuvraj Ramchandra Yedure