सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार व मनसेचे ध्येय धोरण लोटेवाडी गावातील प्रत्येक घरामध्ये पोहोचवणार शाखाध्यक्ष वैभव पाटील
(मनसे नेते युवराज येडूरे, राजेंद्र चव्हाण, अशोकराव पाटील, राजेश पाटीलाच्या हस्ते भुदरगडतालुक्यातील लोटेवाडी मनसे शाखांचे भव्य उद्घाटन)
मनसेच्या “महासंपर्क अभियानाचे” औचित्य साधून आज मनसे नेते युवराज येडूरे, राजेंद्र चव्हाण, अशोकराव पाटील, राजेश पाटील यांच्या हस्ते मनसेच्या भुदरगड तालुक्यातील लोटेवाडी गावाच्या शाखांचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटन प्रसंगी सामाजिक उपक्रम आणि संकल्प स्वीकारून मनसेने अनोखे उपक्रम राबविले असल्याचे भुदरगड तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक आणि जनसमुदाय उपस्थित होता. स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर मनसेमय केला होता. महाराष्ट्र सैनिकांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी मनसेचे गटनेते युवराज येडूरे म्हणाले भुदरगड तालुक्यातील लोटेवाडी या गावात मनसेची शाखा ओपन करून अभिनव उपक्रमाचे कौतुक वाटत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच लोटेवाडी शाखा अध्यक्ष वैभव पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे बळ दिले, तसेच लोटेवाडी गावचे जुने जाणते ज्येष्ठ मारुती सारंग यांनी सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचे विचार गावामध्ये रुजवल्याबद्दल त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे उद्गार त्यांनी काढले, यापुढे राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आवाज हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल सत्ता काबीज करण्यासाठी जनतेची काम तळागाळापर्यंत केली पाहिजेत त्यांचा विश्वास संपादन केला पाहिजेत सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सर्वच शाखेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्हावे असे त्यांना आवाहन केले
यांच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी राधानगरी तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण मनाली की येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय आम्ही साहेब ठाकरे आपल्या भागात दौरा करणार आहेत आणि या माध्यमातून सर्व शाखाध्यक्षांना बळ मिळणार आहे त्यामुळे ताकतीने काम करा येणाऱ्या निवडणुका ताकतीने जिंकायच्या आहेत असे त्यांनी आव्हान केले. या उद्घाटन प्रसंगी राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडूरे, राधानगरी तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, शहराध्यक्ष राजेश पाटील, भुदरगड तालुकाध्यक्ष अशोकराव पाटील, लोटेवाडी शाखा अध्यक्ष वैभव पाटील, विभाग अध्यक्ष मारुती सारंग,अमित कोरे, अशोक सारंग, सातापा खवरे, नारायण पाटील, संतोष सातपुते, साताप्पा राजगिरे, बाबू खवरे, सुभाष लाड, पांडुरंग सारंग, गणेश सारंग, सदाशिव सारंग व लोटेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.By: Yuvraj Ramchandra Yedure