YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसे सभासद नोंदणी शुभारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद

  • Home
  • कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसे सभासद नोंदणी शुभारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसे सभासद नोंदणी शुभारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसे सभासद नोंदणी शुभारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून, या भूमिकेचे पडसाद राज्यात उमटले होते राज ठाकरे यांचा नाशिक दौरा तोंडावर असतानाच त्यांच्या पाठीच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यानंतर दोन-तीन महिन्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना परवा मुंबईत मार्गदर्शन केले. त्यानंतर ते पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांनी पुण्यातून मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणीच्या शुभारंभ केला . याच धरतीवरती कोल्हापूर जिल्हा मनसे संपर्क अध्यक्ष जयराज लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेची सदस्य नोंदणी शुभारंभ राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडूरे यांच्या हस्ते कार्यक्रम व जनजागृती रॅली शुभारंभ मुधाळ तिट्टा येथून भुदरगड, राधानगरी, आजरा या तालुक्यांमध्ये रॅली आज मोठ्या संख्येने निघाली याच धर्तीवर मनसे पक्षाची जास्तीत जास्त नोंदणी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आज जनजागृतीच्या माध्यमातून राज ठाकरे यांचे विचार लोकांपर्यंत रुजवण्याचे काम राधानगरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी केले, यावेळी मनसे सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाला दोन ते अडीच वर्षानंतर सदस्य नोंदणी करावी लागते त्यानुसार ही नोंदणी होत असल्याचं युवराज येडूरे हे म्हणाले.
जे सदस्य होणार आहेत त्या सदस्याला प्रत्येक आठवड्यात काहीतरी नवीन गोष्ट पक्षाकडून त्यांच्या मोबाईलवर जाणार आहे. त्यामध्ये राजसाहेब ठाकरे यांचे भाषणं असतील. महाराष्ट्रासंबंधी काही विषय असतील अशा गोष्टी त्यामध्ये असतील, या सदस्य नोंदणीमध्ये मी माझं प्राथमिक सदस्यत्व नोंदवलं आहे. तुम्हीही मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावं. व राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा उत्कर्ष व्हावा विकास व्हावा यासाठी नागरिकांनी मनसेचे सदस्य स्वीकारावे असं आवाहन युवराज येडूरे यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना, व राधानगरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना यावेळी केलं.

गारगोटी येथे हुतात्मा स्मारका समोर युवराज येडुरे म्हणाले की आज राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये ज्या गोष्टी केल्या जात नाहीत, विकासाच्या गोष्टी बोलल्या जात नाहीत, कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी आवाज उठवायला तयार नाही मात्र यापुढे राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसे आवाज उठवेल सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारेल जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्यासाठी तत्पर आहे, आपण आम्हाला साथ द्यावी आम्ही आपल्याला नक्कीच न्याय मिळवून देऊ सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ घ्यावी ही आपणास मी विनंती करतो,

यावेळी भुदरगड तालुका अध्यक्ष विक्रम आरडे, राधानगरी शहराध्यक्ष राजेश पाटील, तालुका उपाध्यक्ष उत्तम चव्हाण मनसे पदाधिकारी अशोक पाटील, धनंजय देसाई,अमित कोरे, सागर शेळके, रणजीत पाटील,प्रवीण मानगुडे, सौरभ कांबळे, प्रवीण पाटील व राधानगरी विधानसभा मतदारसंघातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Events