शहरात पूर्वी मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येत होती. वेगवेगळे परिसर पक्षिजीवन, दुर्मिळ वृक्ष, सरपटणारे प्राणी, कीटक, फुलपाखरे यांच्यासाठी प्रसिद्ध होते. पण कालौघात या जैवविविधतेला ग्रहण लागून त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
शहरात पूर्वी मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येत होती. वेगवेगळे परिसर पक्षिजीवन, दुर्मिळ वृक्ष, सरपटणारे प्राणी, कीटक, फुलपाखरे यांच्यासाठी प्रसिद्ध होते. पण कालौघात या जैवविविधतेला ग्रहण लागून त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शहराच्या कोणत्या परिसरात पक्षिजीवन समृद्ध आहे, कोठे कोणते प्राणी, दुर्मिळ वृक्ष आहेत याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होण्याची गरज आहे. ताराबाई पार्क आणि नागाळा पार्क परिसरात पोपटांची संख्या अधिक आहे, असे लक्षात आले तर त्यांच्या संवर्धनासाठी अभ्यास व्हायला हवा. असे झाल्यास एखादी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असेल तर त्याची कारणे शोधून उपाययोजना करणे शक्य होणार आहे. एकंदरीत जैवविविधतेच्या बाबतीत शास्त्रीय पद्धतीने अभ्यास होणे गरजेचे आहे.
आपल्या परिसरातील जैवविविधता नेमकी काय आहे हे समजत नाही, तोपर्यंत त्यांच्यासमोरील धोके समजणे आणि संवर्धनाचे प्रकल्प हाती घेणे कठीण जाते, त्यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमी संस्थांनी लक्ष देणे गरजेचे आहे. कोल्हापूर शहरातील नेमकी जैवविविधता कशी आहे, कोणकोणते पक्षी, प्राणी आहेत, मायक्रोफौना काय आहे, जलाशय आणि नदीतील जैवविविधता नेमकी काय आहे, हे समजणे अतिशय गरजेचे आहे.
आपण जर पंचगंगा नदीचे उदाहरण घेतले तर शिवाजी विद्यापीठाने सन १९८८ मध्ये पंचगंगा नदीतील माशांवर अभ्यास केला होता, त्यानंतर २००८ ला पुन्हा अभ्यास करण्यात आला.
१९८८ चा सर्व्हे उपलब्ध असल्याने २००८ मध्ये नदीतील माशांच्या विविध जातींची संख्या किती कमी झाली याचा अभ्यास करता आला, पण दुर्दैवाने अशा
पद्धतीचा सर्व्हे अन्य जलचरांबाबत उपलब्ध नाही.
अशीच स्थिती शहरातील पक्ष्यांबाबत आहे. पूर्वी मैलखड्डा परिसरात मोठ्या प्रमाणावर गिधाडे आढळत. आता हा पक्षी पूर्णपणे अडचणीत आला आहे, पण कोल्हापूर शहरातील गिधाडांबद्दल आपण आज नेमकेपणाने काही सांगू शकत नाही. पूर्वी पंचगंगेच्या काठी पेरूची बाग
असल्याने त्या परिसरात विविध पक्ष्यांची संख्या फार मोठी होती, पण कालौघात ही बागच नष्ट झाल्याने येथील पक्षीसुद्धा कमी झाले.
शहरात दिसणारी फुलपाखरे आणि चिमण्यांची संख्या कमी झाल्याचे कोणीही मान्य करू शकेल, पण त्याचा नेमका अभ्यास नसल्यामुळे त्याचे गांभीर्यसुद्धा लक्षात येत नाही.
रानमोडी नावाची वनस्पती शहरात फोफावत आहे. असे काही तण का वाढत आहे, याची आपल्याला माहिती असत नाही. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा आपण जागे होतो. अर्थात सर्वच काही वाईट सुरू आहे असे नाही. पेंटेड स्टॉर्कसारखा देखणा पक्षी आज न्यू पॅलेस परिसरात निवासीच झाला आहे. शिवाजी विद्यापीठात नव्याने बनविलेल्या तलावांत जैवविविधता दिसू लागली आहे.
शहरात कोणत्या परिसरात पक्षिजीवन समृद्ध आहे, कोठे कोणते प्राणी दिसतात, कोणत्या परिसरात कोणते दुर्मिळ वृक्ष आहेत याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होण्याची गरज आहे. समजा, ताराबाई पार्क आणि नागाळा पार्क परिसरात पोपटांची संख्या अधिक आहे, असे लक्षात आले तर त्यांचे संवंर्धन अधिक चांगल्या पद्धतीने कसे होईल हे पाहता येऊ शकेल. असा अभ्यास जर दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी होऊ शकला तर तुलानात्मक माहिती उपलब्ध होऊन एखादी प्रजाती अडचणीत आली असेल तर त्याची कारणे शोधणे आणि त्यावर उपाययोजना करणे शक्य होणार आहे. शहरातील एकूण जैवविविधतेच्या बाबतीत आपण अधिक जागृत असले पाहिजेच, त्याचबरोबरीने त्याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यासही झाला पाहिजे. असे मत महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्य अध्यक्ष युवराज येडूरे दिले.By: Yuvraj Ramchandra Yedure