"आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही काहीच महिन्यापूर्वी कौलव येथील कांबळे कुटुंबातील दोन मुले यांचे वडील अपघातामध्ये मयत झाले व त्यांच्या वरती दुःखाचा डोंगर कोसळला तसेच तारळे येथील जाधव कुटुंबातील दोन मुली व एक मुलगा यांचे देखील आई आणि वडील हे दोन्हीही मयत झाली यांना कोणाचाच आधार नव्हता अशा दोन्हीही कुटुंबातील पाच मुला मुलींना आधार देण्याकरिता, मनसे राज्य मा. सचिव सचिन मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्या मुलांना व पालन पोषण करण्यासाठी दत्तक घेतली होती, आज त्यांना दिवाळीनिमित्त मुलांना व कुटुंबाला कपडे देऊन त्यांची दिवाळी साजरी केली, आज या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप मनाला भावला खूप आनंदही हा क्षंण होता, खरंच माझ्यासारख्या महाराष्ट्र सैनिकाला अशी सेवा करण्याची संधी मिळाली हे माझं मी भाग्य समजतो, व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आमच्यावरती जे विचार आणि जे संस्कार केले आशा सर्वच महाराष्ट्र सैनिकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचा आनंद आज आम्हा सर्वांना अनुभवायला मिळाला,
"आम्ही आपणास सर्वांना एक जाहीर आव्हान करत आहोत की असे ८४४ कुटुंब राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आहेत, त्या मुलांना शैक्षणिक व पालनपोषणाची गरज आहे, अशी असंख्य मुले ज्यांची आमच्याकडे यादी आहे, अशा गरजू मुलांना आपल्यासारख्या दानशूर व्यक्तीने पुढे येऊन मदत करावी ही आपणास आज दिपवाली निमित्त विनंती करत आहे.
आपला नम्र
युवराज येडूरे
राधानगरी विधानसभा मतदारसंघ
https://www.yuvrajyedure.com/By: Yuvraj Ramchandra Yedure