झिम्मा-फुगडी मनसे तर्फे झालेल्या कार्यक्रम उत्साहात संपन्न.
कोल्हापूर: येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महा महिला बचत गट निधी लिमिटेड अंतर्गत झिम्मा-फुगडी स्पर्धा टिटवे येथील श्री लक्ष्मी मंगल कार्यालय येथे झाली. यामध्ये श्री कालिका महिला बचत गट, पडळी कासारवाडी प्रथम क्रमांक पटकाविला. दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. धनलक्ष्मी महिला बचत गट, पंडेवाडी दुसरा क्रमांक, तर ज्ञानेश्वरी माऊली महिला बचत गट चंद्रे, तर तिसरा क्रमांक, व माऊली महिला बचत गट मजरे कासारवाडा यांनी चौथा क्रमांक मिळविला. त्यांना अनुक्रमे १)दहा हजार २)सात हजार 3)पाच हजार ४) तीन हजार रुपयांची रोख, सन्मानपत्र व सहभागी महिलांना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत 21 संघ सहभागी झाले होते. तसेच वैयक्तिक काटवट कणा घागर घुमवणे सूप नाचवणे उखाणा घेणे यामध्ये सहभागी झालेल्या महिलेला सहभागी सन्मान प्रमाणपत्र व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रधान केली यावेळी महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्य अध्यक्ष व मनसे राधानगरी विधानसभा गटनेते युवराज येडूरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये राधानगरी मनसे शहर अध्यक्ष राजेंद्र पाटील, मनसे उपाध्यक्ष उत्तम चव्हाण,रणजीत पाटील, सागर शेळके, विनायक जाधव, प्रवीण मनुगडे,राहुल कुंभार, वृषभ आमते, सागर कुंभार, सुजित पाटिल,अमृत पाटील, ओंकार पाटील, सौरभ कांबळे, अमित कोरे, गजानन साबळे यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण झाले. प्रा. पुनम देसाई, सुजाता जाधव, मुस्कान आत्तार, यांनी परीक्षण केले. सूत्रसंचालन सलोनी खोळांबे यांनी केले, संयोजन साजिदाखानम मोमीन, संगीत पाटील,ऋतुजा पाटील,अश्विनी कोळी, स्मिता राजिगरे,अश्विनी आमते,पुजा पाटील,नम्रता खोत,अनुजा कळेकर, प्रणोती देसाई, रेखा पाटील,पूनम गुरव,जया बाबर यांनी केले वर्षा पाटील यांनी आभार मानले.
By: Yuvraj Ramchandra Yedure