YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

समित्यातून तालुक्याचे बहुतांशी प्रश्न सोडविण्यात येतात

  • Home
  • समित्यातून तालुक्याचे बहुतांशी प्रश्न सोडविण्यात येतात
समित्यातून तालुक्याचे बहुतांशी प्रश्न सोडविण्यात येतात

समित्यातून तालुक्याचे बहुतांशी प्रश्न सोडविण्यात येतात

तालुक्यातील समित्या 
      लोकशाहीतील प्रत्येक निर्णय हा लोकहिताचा आणि संरक्षणासाठी असतो. प्रत्येक शासन लोकहिताचे विविध निर्णय घेत असते. परंतू बरेच वेळा अशा निर्णयांची अंमलबजावणी होत नाही. किंवा जरी झाली तरी ती सदोष असते. या सर्व बाबी विचारात घेवून प्रशासकीय कामात समाजातील , समाजसेवक, विविध घटकातील प्रतिनीधी इ. चा समावेश करण्यात येतो. असा समावेश करते वेळी विविध समित्या स्थापन करून त्यावर अशा सदस्यांची निवड करण्यात येते.
     तालूका स्तराचा विचार केला तर पुढील समित्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या समित्यातून तालुक्याचे बहुतांशी प्रश्न सोडविण्यात येतात.
1.  तालुका भ्रष्टाचार निर्मुलन समिती 
2.  तालुका समन्वय समिती
3.  तालुका शांतता समिती
4.  तालुका दारूबंदी समिती
5.  तालुका दक्षता समिती
6.  नगरपालिका दक्षता समिती
7.  तालुका व्यसनमुक्ती समिती
8.  तालुका तंटामुक्ती समिती
9.   तालुका क्रीडा संकुल समिती
10.  तालुका संजय गांधी योजना           समिती
11.   तालुका नैसर्गिक आपत्ती समिती
12.  तालुका जलयुक्त शिवार अभियान आढावा व समन्वय समिती 
13.  वेठबिगार निर्मुलन दक्षता समिती
14.  तालुका दुष्काळ निवारण समिती
15.  तालुका कांदळवन संरक्षण व संवर्धन समिती
16.  तालुका विशाखा समिती
17.  तालुका रूग्ण समिती
18.  राजीव गांधी गतीमान प्रशासन अभियान समिती
19.  तालुका रोजगार हमी योजना समिती
सर्व समित्यांचे कामकाज त्यांच्या बैठका कार्याचे स्वरूप जर नागरीकाने समजून घेतले तर निश्चित तालुक्यातील समस्या यात त्याचा उपयोग होणार आहे.
   सर्व सामान्य नागरीक, एन जी ओ, समाजसेवक यांनी समित्यांची रचना व कार्यपध्दती समजून घेवून त्या आपल्या होतात का...? जर होत नसतील तर त्या कशा होतील अग्रही राहावे. जनतेत विविध समित्यांची जनजागृती त्याची माहीती जास्तीत जास्त व्यक्तींना देवून समित्यांचा आढावा घ्यावा. या हेतूने स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था शेणगांवचे अध्यक्ष युवराज येडूरे यांनी सदर माहिती करून देण्याचा प्रयत्न केला आहे. पिडीत, त्रस्त व आवश्यकता असणारे सर्व नागरीकांना जेव्हा उपरोक्त न्याय मिळेल तेव्हा आमचा उद्देश निश्चित साध्य होईल.

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs