लोकप्रतिनिधीच बनताहेत
सर्वसामान्यांचे कर्दनकाळ...राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर न्यायासाठी दाद कोणाकडे मागायची?
जे लोकप्रतिनिधी जनतेच्या विश्वासावर निवडणुका लढवतात तेच लोकप्रतिनिधी सध्या सर्वसामान्यांचे कर्दनकाळ बनले आहेत. मागील पाच ते सहा दिवसांत भुदरगड तालुक्यात व्हीव्हीआयपींकडून घडलेल्या अपघातांची प्रकरणे दडपण्याचे प्रकार या बोलघेवड्या लोकप्रतिनिधीकडून झाले आहेत. प्रकरणे दडपण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलिसांवरही दबाव टाकण्यात येत आहे. पिंपळगावजवळ व इतर झालेल्या अपघातांची प्रकरणे दडपून गरीब लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. हे लोकप्रतिनिधी जरी पैशांच्या व सत्ताकारणाच्या जोरावर दडपशाही करत असतील तर त्या विरोधात आम्ही त्यांना सडेतोड उत्तर देऊ. तसेच अन्यायग्रस्तांच्या पाठिशी ठामपणे राहू.
लोकशाहीत व्हीआयपी लोकांसाठी सामान्य लोकांचा आवाज दडपणाऱ्या हुकूमशाहीविरोधात आपण एकसंधपणे आवाज उठवूया. अन्यायग्रस्तांना मी शेवटपर्यंत न्याय मिळवून देणारच.
जनता जनार्दनाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे.सस्नेह जय महाराष्ट्र!
||आपला नम्र||
"युवराज येडूरे"
गटनेता:- राधानगरी विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाभुदरगड तालुक्यात चालू असलेल्या या हुकूमशाही व दडपशाहीबाबत आपणास काय वाटते?
या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया नोंदवा, जेणेकरून बोलघेवड्या लोकप्रतिनिधींना जाग येईल.
By: Yuvraj Ramchandra Yedure