ई-कचरा निर्माण करणाऱ्या पहिल्या ५ देशांमध्ये भारताचा समावेश आहे. आम्ही दरवर्षी सुमारे 5.2 मिलियन टन ई कचरा निर्माण करतो आणि त्यात वेगाने वाढ होत आहे.
ई-कचऱ्याची बेजबाबदारपणे विल्हेवाट लावल्याने वातावरणात विषारी वायू बाहेर पडतात ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात.
तुमच्या ई-कचऱ्याची नेहमी वर्गवारी करा आणि एक्सचेंज ऑफरवर जाऊन किंवा उत्पादक, स्टोअर्स, एनजीओ किंवा महानगरपालिका प्राधिकरणांद्वारे प्रदान केलेली ई-कचरा संकलन सेवा वापरून जबाबदारीने त्याची विल्हेवाट लावा. सोसायट्यांनी ई-कचर्याचे स्वतंत्र संकलन करण्यास आणि नंतर अधिकृत री-सायकलर्सकडे सुपूर्द करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.भारतात या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपल्याला खूप जागरूकता आणि पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.
By: Yuvraj Ramchandra Yedure