YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

ग्राहकांना पायाभूत सोयीसुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या पेट्रोलपंप चालकांचे डोके ठिकाणावर आणण्याची मोहीम आज कडगावात राबवण्यात आली

  • Home
  • ग्राहकांना पायाभूत सोयीसुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या पेट्रोलपंप चालकांचे डोके ठिकाणावर आणण्याची मोहीम आज कडगावात राबवण्यात आली
ग्राहकांना पायाभूत सोयीसुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या पेट्रोलपंप चालकांचे डोके ठिकाणावर आणण्याची मोहीम आज कडगावात राबवण्यात आली

ग्राहकांना पायाभूत सोयीसुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या पेट्रोलपंप चालकांचे डोके ठिकाणावर आणण्याची मोहीम आज कडगावात राबवण्यात आली

ग्राहकांना पायाभूत सोयीसुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या पेट्रोलपंप चालकांचे डोके ठिकाणावर आणण्याची मोहीम आज कडगावात राबवण्यात आली. कडगाव येथील हिंदुस्तान पेट्रोलियमचा इंगवले पेट्रोलियमच्या व्यवस्थापकांना मनसेचे राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडूरे यांनी सुविधांबाबत जाब विचारला.
मनसेच्या जनहित कक्ष विभागाकडे कडगाव येथील पेट्रोलपंपाबाबत लोकांच्या तक्रारी आल्यामुळे सदरची ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या पाहणीत ग्राहकांना पायाभूत सुविधा येथे उपलब्ध नाहीत. येथील स्वच्छतागृहाला कुलूप लावण्यात आले होते. याची विचारणा करताच तात्काळ ग्राहकांसाठी ते खुले करण्यात आले असता स्वच्छतागृहात पाणी नसल्याचे समोर आले. येथे वाहनात हवा भरण्याचे यंत्रही नादुरुस्त स्थितीत होते. या दरम्यान, तेथे पेट्रोल भरण्यास आलेल्या ग्राहकांनीही येडूरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुविधांमुळे होणाऱ्या गैरसोयीबाबत माहिती दिली. या मोहिमेवेळी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येत्या काही दिवसांता पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यात येणार असल्याची माहिती पेट्रोलपंप व्यवस्थापकांनी दिली.
https://youtu.be/b4FDgeiau98

By: Yuvraj Ramchandra Yedure

Latest Blogs