YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

"नोव्हेंबर महिन्यामध्ये; "पुणे येथे "महाराष्ट्र एनजीओ राज्यव्यापी अधिवेशनामध्ये स्वयंसेवी एनजीओ संस्थेने सहभाग घ्यावा:युवराज येडूरे

  • Home
  • "नोव्हेंबर महिन्यामध्ये; "पुणे येथे "महाराष्ट्र एनजीओ राज्यव्यापी अधिवेशनामध्ये स्वयंसेवी एनजीओ संस्थेने सहभाग घ्यावा:युवराज येडूरे

"नोव्हेंबर महिन्यामध्ये; "पुणे येथे "महाराष्ट्र एनजीओ राज्यव्यापी अधिवेशनामध्ये स्वयंसेवी एनजीओ संस्थेने सहभाग घ्यावा:युवराज येडूरे

"नोव्हेंबर महिन्यामध्ये; "पुणे येथे "महाराष्ट्र एनजीओ राज्यव्यापी अधिवेशनामध्ये स्वयंसेवी एनजीओ संस्थेने सहभाग घ्यावा:युवराज येडूरे

महाराष्ट्रातील सर्व समाजसेवेत कार्यरत स्वयंसेवी संस्थेच्या न्याय - हक्कासाठी महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन,आयोजित महाराष्ट्र एनजीओ राज्यव्यापी अधिवेशन नोव्हेंबर 2022 पुणे येथे होणार आहे.
महाराष्ट्र NGO समिती स्वयंसेवी क्षेत्रात आपल्या महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्याच्या कार्यक्षमता संवर्धन व संस्था सक्षमीकरणाचे महत्वाचे काम महाराष्ट्र NGO समिती करीत आहे . स्वयंसेवी संस्थेच्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांमुळे अनेक समाजिक प्रकल्पाची उभारणी व त्यांची यशस्वी अमलबजावणी शक्य झाली आहे . स्वयंसेवी संस्थेच्या निकोप वाढीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ व समक्ष मानव सहसाधनांचा अभाव निधी संकलन , प्रकल्प बांधणी मांडणी , प्रकल्प लेखन व प्रकल्प सहनियंत्रण मुल्याकंन हे संस्थेपुढील काही प्रमुख प्रश्न व आव्हाने आहेत स्वयंसेवी संस्थेच्या या मुख्य अडचणी लक्षात घेऊन स्वयंसेवी संस्थेसाठी दस्तऐवज लेखन आणि संकलन व संभाषण कौशल्य संस्थेच्या चांगल्या जडणघडणीसाठी ज्ञान कौशल्य व निती मुल्याचे संवर्धन क्षमता बांधणी सक्षमीकरण व त्या अनुषंगाने बळकटीकरण हा मुळ उद्देश समोर ठेवून संस्था पातळीवर अतिशय महत्वाचे दस्तऐवज व आर्थिक व्यवस्थापनातील दस्तऐवज इत्यादी विषयावर आपली महाराष्ट्र NGO समिती च्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील NGO बरोबर अधिवेशनामध्ये सखोल चर्चा करण्यात येईल या सर्व चर्चेचा आपल्या स्वयंसेवी संस्थेला सर्वांगीण विकासाचा फायदा होईल . इथूनपुढे देखील आपल्या कामात नेहमीच उपयोग होत राहील . महाराष्ट्र NGO समिती महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थेचा आधार व मदर NGO असेल या कार्यामध्ये महाराष्ट्रातील स्वयंसेवी सेवाभावी ट्रस्ट फौंडेशन , शैक्षणिक संस्था वाचनालय , सर्व नोंदणीकृत संस्था सदस्य असतील तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या आहेत . तरी सर्व संस्थेने महाराष्ट्र एनजीओ राज्यव्यापी अधिवेशनामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्य अध्यक्ष युवराज येडूरे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
नियोजन कार्यान्वित यंत्रणा
महाराष्ट्र एनजीओ राज्यव्यापी अधिवेशन समिती
8208240646 / 7666458384 / 8208934546

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs