मनसेच्या मागणीला यश कपिलेश्वर ग्रामपंचायत मध्ये आजी-माजी सैनिकांचा कायमस्वरूपी बोर्ड
राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर गावांमध्ये आजी-माजी सैनिकांचा कायमस्वरूपी बोर्ड लावण्यात आला या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्ष विधी विभागाचे मा राज्य उपाध्यक्ष युवराज येडूरे,राधानगरी मनसे तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण,
यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन कार्यक्रम पार पडला यावेळी मनोगत व्यक्त करत असताना जनहित कक्ष विधी विभागाचे मा राज्य उपाध्यक्ष युवराज येडूरे म्हणाले 15 ऑगस्ट 2021रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय कडे मेल द्वारे सर्व ग्रामपंचायत मध्ये आजी माजी सैनिकांचा कायमस्वरूपी बोर्ड लावण्याची मागणी केली होती या मागणीचा विचार करून राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर गावांमध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवून ग्रामपंचायतीने बहुमान मिळवला असे उद्गार त्यांनी काढले,तसेच राधानगरी तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण जे सैनिक दिवसरात्र पहारा देतात म्हणून आम्ही याठिकाणी सुखाने झोपू शकतो अशा व्यक्तींचा ग्रामपंचायत मध्ये बोर्ड लावणे नितांत गरज होती ही गरज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्ण करून या ग्रामपंचायतीने जिल्हात आदर्श निर्माण केला आहे या बद्दल त्यांचा आम्ही अभिनंदन करतो असे उद्गार त्यांनी काढले ,तसेच सरपंच भोसले यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी उपस्थितBy: Yuvraj Ramchandra Yedure