YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही

  • Home
  • राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही
राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही

राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही

राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवानं आपण तशा व्यापक अर्थानं त्याच्याकडे पाहत नाही.

"आपला देश किंवा राज्य कसं चाललं पाहिजे? कुठल्या तत्वांवर चाललं पाहिजे? त्याचे आग्रह काय असले पाहिजेत? राज्य कशासाठी चालवलं पाहिजे? याचा विचार मांडणं, त्या विचाराचा आग्रह धरणं आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणं, त्या जिंकणं, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवणं" म्हणजे राजकारण.

म्हणूनच राजकारण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं, त्या विचाराला मूल्यांचा आधार असणं आवश्यक आहे, हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा, काही आग्रह असणं आवश्यक आहे. तो विचार आपण सर्वांनी मिळून ठरवावा, कुठे जायचं ते निश्चित करावं, आपली दिशा पक्की असावी आणि आपण सर्वांनी मिळून एका मोठ्या संपन्न महाराष्ट्राचं स्वप्न पहावं म्हणून यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावरती गावाचे विकास आराखडे तयार करणे काळाची गरज आहे, असे मत महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्याध्यक्ष युवराज येडूरे म्हणाले.

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs