मनसेच्या आंदोलनाला यश राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर गावात रस्त्याचे काम सुरू..
मौजे कपिलेश्वर तालुका राधानगरी येथील मांगेवाडी ते तुरंबे फाटा गावात जाणारा रस्ता प्रजिमा 44 हा पूर्णपणे उघडून गेला आहे, यासंदर्भात उपविभागीय अभियंता सा.बा उपविभाग, राधानगरी यांना लेखी कळवलं असतात, या संदर्भात ठोस पावले प्रशासने उचलली नसल्यामुळे व समाधानकारक लेखी उत्तराच्या माध्यमातून न मिळाल्यामुळे खड्ड्यांविरोधात मनसेचा‘ थाळी - नाद’ व खड्ड्यामध्ये वृक्षारोपण आंदोलनाचा कपिलेश्वर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला, मनसेचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडुरे यांनी रस्त्यावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांत पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकही त्रस्त आहेत. त्यामुळे एखादा अपघात होण्याची भीती मनसेने व्यक्त करत खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी केली. यावेळी आंदोलन स्थळावर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातच वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन केले होते , याची दखल घेत सार्वजनिक बांधकामाची विभागाचे अधिकाऱ्यांच्या कडून तात्काळ असता करण्याचे काम सुरू झाले आहे यातून कपिलेश्वर नगरीतील नागरिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कौतुक करत आहेत जे सत्तेवर ते आहेत त्यांनी केले नाही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी करून दाखवलं
By: Yuvraj Ramchandra Yedure