"युवराज येडूरे, यांना अमेरिका देशातील न्यूयॉर्क राज्याच्या डब्ल्यूएचआरपी ऑर्गनायझेशनची मास्टर ऑफ सोशल वर्क, एनजीओ / सीएसआर / एमसीए डेव्हलपमेंट मॅनेजमेंट हि मानद डॉक्टरेट पदवी बहाल होणार
भुदरगड तालुक्यातील शेणगावचे युवराज येडुरे यांनी गेली 14 वर्ष स्वराज्य संस्था व महा एनजीओ च्या माध्यमातून अनेक विषयावरती सामाजिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभर ते काम करत आहेत, आणि हे काम करत असताना त्यांची सामाजिक कामाची दखल अमेरिका देशातील न्यूयॉर्क राज्याने घेतली, येथील डब्ल्यूएचआरपी ऑर्गनायझेशनची मास्टर ऑफ सोशल वर्क आणि एनजीओ / सीएसआर / एमसीए डेव्हलपमेंट मॅनेजमेंट हि मानद डॉक्टरेट पदवी बहाल होणार आहे या संदर्भातील पत्र युवराज येडूरे यांना प्राप्त झाले, तसेच विश्व मानवाधिकार सुरक्षा आयोग, नवी दिल्ली चे आजीवन सदस्यत्व त्यांना देण्यात आले आहे, युवराज येडूरे हे सध्या महाराष्ट्र एनजीओ समितीचे राज्याध्यक्ष तसेच स्वराज्य एनजीओ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच महा सी एस आर डेव्हलपमेंट असोसिएशनचे राज्य अध्यक्ष व महा महिला बचत गट निधी लि चे मॅनेजमेंट डायरेक्टर तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड आयुर्वेदिक रिसर्च सेंटर चे अध्यक्ष आहेत, यानिमित्ताने युवराज येडूरे म्हणाले मला सर्व सांगत असताना खूप आनंद होत आहे, कारण आपण काम करत असतो पण आपल्या कामाची दखल कोण घेत नाही असं आपण सतत म्हणत असतो, पण या माध्यमातून आपल्या कामाची दखल कोणीतरी घेत असतं हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे त्यामुळे चांगलं काम करायचं कधीच सोडायचं नाही हे ब्रीदवाक्य घेऊन मी पुन्हा त्याच जोशाने यापुढे देखील काम करत राहणार, यानिमित्ताने मी मला बहाल होणाऱ्या मानद डॉक्टरेट पदवी माझ्या सुरुवातीच्या कठीण काळामध्ये माझ्याबरोबर काम करणाऱ्या माझे सहकारी, माझे आई-वडील, भाऊ, तसेच प्रत्येक संकटाच्या काळामध्ये खंबीरपणे माझ्यामागे उभी राहणारी माझी बायको तसेच हितचिंतक यांना मी मनःपूर्वक मानद डॉक्टरेट पदवी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती बहाल करत आहे. अशीच साथ असेच आशीर्वाद आपल्याकडून कायम मिळत राहो हीच आपणास सदिच्छा अशा शब्दात त्यांनी व्यक्त केले, यानिमित्ताने त्यांच्यावरती अभिनंदनांचा वर्षाव करत आहेत, त्यांच्या सहकारी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिकांनी उत्साहाचे वातावरण आहे सर्वजण आनंद उत्सव साजरा करत आहे,
By: Yuvraj Ramchandra Yedure