YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

#विकास" म्हणजे "#टिकाऊ विकास", "#चिरंतन विकास"

  • Home
  • #विकास" म्हणजे "#टिकाऊ विकास", "#चिरंतन विकास"
#विकास

#विकास" म्हणजे "#टिकाऊ विकास", "#चिरंतन विकास"

#विकास" म्हणजे "#टिकाऊ विकास", "#चिरंतन विकास" 

आणि तो करताना काहीही ओरबाडणार नाही, उद्याच्या पिढ्यांना त्रास होणार नाही तो विकास असं आम्हीही मानतो. त्यासाठी आम्ही १० प्रश्न समोर ठेवले आहेत. ज्यांची उत्तरे दिल्यावर विकास झाला की नाही हे ठरेल. ते प्रश्न असे:

1)लोक सुरक्षित आहेत ना?
राधानगरी मतदारसंघातील माणसा-माणसांमध्ये.

2)आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक गोष्टींमध्ये भीषण अशी तफावत तर नाही ना?

3)लोकांना पुरेसं खायला आणि पुरेसं प्यायला शुद्ध पाणी मिळतंय ना?

4)लोकांना परवडणारी घरं - त्यात शांतता, खाजगी जागा, नळानं पाणी, शौचालय अशा सुविधा - मिळताहेत ना?

5)त्यांना पुरेशा, समाधानकारक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत ना?

6)ते त्यांच्या मुलांना त्यांना परवडेल अशा पद्धतीनं दर्जेदार आणि नव्या युगाच्या दृष्टीनं योग्य असं शिक्षण देऊ शकताहेत ना?

7)त्यांना त्यांच्या जवळ आणि त्यांना परवडेल अशी आरोग्य सेवा मिळतीय ना?

8)त्यांना शुद्ध हवा, त्यांच्या हक्काची नैसर्गिक साधनसंपत्ती, सोयी-सुविधा आणि मनोरंजनाची साधनं मिळताहेत का?

9)लोकांमध्ये अस्मिता जागृत आहे का?

10)ते भविष्याकडे आशेनी, अपेक्षेनी, महत्वाकांक्षेनी पहाताहेत ना?

अगदी थोडक्यात -

विकास म्हणजे लोकांचा विकास.

विकास म्हणजे लोकांची सुरक्षितता, लोकांचा आनंद.

विकास म्हणजे सर्वांना पुढे जाण्याची संधी.

राधानगरी मतदारसंघाकडे जे आहे ते वाचवणं, टिकवणं, जोपासणं आणि वाढवणं म्हणजे 'विकास'. मग त्यात निसर्ग आला, संपत्ती आली, नद्या आल्या, माणसं आली, माणसांची क्षमता आली, मराठी संस्कृती आली.

मतदार संघाचा विकास म्हणजे #राधानगरी #आजरा #भुदरगड तालुक्यातील  लोकांचा विकास#

          सस्नेह जय महाराष्ट्र
              युवराज येडूरे
www.yuvrajyedure.com

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs