गुन्हेगारी वाढते आहे
समाज बदलला तशी गुन्हेगारी बदलली. झपाट्यानं बदलली. त्याचं स्वरूप बदललं. पण त्याचे कायदे, त्यासाठी लागणारी प्रशासन यंत्रणा तशीच राहिली. गुन्हेगारीच्या प्रमाणाला जोपर्यंत चाप लागत नाही तोपर्यंत माणसाला सुरक्षित वाटणार नाही. मात्र आपल्याला जुन्या मार्गानं, जुन्या कायद्यानं नवीन प्रश्न सोडवता येणार नाहीत. आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, कायद्याची नवी चौकट बसवावी लागेल. लोकांचा सहभाग घ्यावा लागेल, नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं लागेल आणि कायदा-सुव्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा कराव्या लागतील.By: Yuvraj Ramchandra Yedure