ग्रामपंचायत लढवणाऱ्यांसाठी 2 दिवसांची निवडणूक . पण , 5 वर्षे सर्वांना नागरिकांना भोगावे लागते . पैसे कमविणे हे डोक्यात ठेऊन निवडणुका लढविणार असाल तर ते अतिशय वाईट आहे . ज्याच्याकडे वेळ , कुवत , ज्ञान , शिक्षण आहे . आपल्या गावचे काही तरी चांगले करायची ताकद आहे अशांनीच या क्षेत्रात यावं . हौशा गवश्यांनी या क्षेत्रात येऊन गावाचा नाश करु नये. राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवानं आपण तशा व्यापक अर्थानं त्याच्याकडे पाहत नाही.असं येडूरे म्हणाले.
By: Yuvraj Ramchandra Yedure