राधानगरी तहसिलदार कार्यालय नायब तहसीलदारसह अनेक रिक्त पदे तात्काळ भरा. युवराज येडूरे
राधानगरी तहसील कार्यालयातील तीन नायब तहसीलदार पदे गेली दोन वर्षापासून रिक्त आहेत . याचबरोबर क्लार्क , तलाठी आणि शिपाईपद सुद्धा रिक्त आहे . यामुळे अव्वल कारकून आणि इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे . अशातच आता ६६ ग्रामपंचायतीच्या मतदान कार्यक्रम सुरु झाला आहे . यामुळे महसूल कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतच आहे . अनेकजण माझ्या कार्यकर्त्याच काम झाल पाहिजे असा अटाहास करताना दिसतात . मात्र रिक्त पदे भरण्यासाठी कोणीही आपली ताकद लावत नाहीत . राधानगरी तालुका वाकीघोलापासून ते म्हासुर्ली , दाजीपुर अशा दुर्गम भागात विखुरलेला आहे . तालुक्यात एकशे बावीस महसुली गावे आहेत अशातच दाजीपुर , राधानगरी , अभयारण्य काळम्मावाडी , तुळशी दोन गेले जलाशय आहेत . वर्षापासून तहसील कार्यालयातील महसूल , निवासी आणि निवडणूक नायब तहसीलदार अशी तीन नायब तहसीलदार पदे रिक्त आहेत . याचा परिणाम महसूल कामावर होत आहे दुर्गम भागातून तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने ताटकळत थांबावे लागते याचबरोबर अव्वल कारकुन , महसूल सहायक आणि इतर महसुली कर्मचाऱ्यांच्यावर कामाचा ताण वाढतच आहे . रोजच्या कामाबरोबर कामासाठी होणारा नागरिकांचा त्रास वेगळाच असतो . अशातच आता तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या अंतीम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून निवडणुकीची लागण्याची श्यक्यता आहे आचारसंहिता तर मुलांचे शैक्षणिक दाखले , पी.एम . किसान यादीची दुरुस्ती , जमाव बंदी आदेश अशी दैनंदिन कामे करावी लागतात . यासाठी या नियोजनाच्या माध्यमातून राधानगरी तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना कडे सदर निवेदन रवाना करून सदर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रिक्त पदे तात्काळ भरावित अन्यर्थ मनसे जन आंदोलन हाती घेईल.असे या नायब तहसीलदार प्रदीप गुडाळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी मनसे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडूरे, तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, शहराध्यक्ष राजेश पाटील , उत्तम चव्हाण, राहुल कुंभार, अमित कोरे, वृषभ आमते, प्रवीण मनुगडे, शहाजी कुंभार, रंणजीत पाटील, सौरभ कांबळे,By: Yuvraj Ramchandra Yedure