स्वराज्य एनजीओ संस्थेची आशी ही भाऊबीज! अनोख्या पद्धतीने साजरी.
भाऊबीज निमित्त ज्या महिलांना माहेर नाही किंवा भाऊ नाही आशा बहिणीसाठी हा उपक्रम राबवत हिंदवी स्वराज्य माहेर घर व पैठणी साडी वाटप करून अनोखी भाऊबीज साजरी करण्यात आली, स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या महिलांना भाऊ नाही व ज्या महिला माहेरी जाऊ शकत नाहीत अशा महिलांनी मनसेचे युवराज येडूरे यांच्याकडे माहेर घराची संकल्पना मांडून ती सत्यात उतरण्यासाठी भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांच्याकडे मागणी केली या मागणीवर युवराज येडूरे यांनी तात्काळ होकार देत लवकरच अशा महिलांसाठी माहेर घर उभा करून अशा महिलांना त्यांना हक्काचं माहेर घर आणि हक्काचा भाऊ मिळेल व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे बळ त्यांनी दिले आहे, दीपावली निमित्त भाऊबीजेच्या निमित्ताने आज अशा सर्वच महिलांनी युवराज येडूरे यांना भाऊ मानत त्यांना औक्षण करण्यात आले, यावेळी डॉ निवेदिता येडूरे यांनी सर्वच महिलांना पैठणी साडी देऊन त्यांचा सन्मान केला यावेळी बोलताना युवराज येडूरे म्हणाले यापुढे समाजामध्ये एकी बहिण भावापासून वंचित राहणार नाही व त्यांना माहेर घराच्या माध्यमातून माहेरचे सर्व प्रेम दिले जाईल तसेच जितके काही माझ्याकडून प्रयत्न करता येईल तितके प्रयत्न करून तुम्हाला आनंदी ठेवण्याचे काम मी करेन, याप्रसंगी गीतांजली सुजाता जाधव, सुनिता चौगुले,प्रियांका कुंभार, सुजाता पोवार,लीला मंदिहली, बाबर, रेखा पाटील, पुनम पाटील, मीनाक्षी पोतदार,स्पंदन कुंभार, श्रावणी महिंद, गौरी महिंद,योगिता पोवार,प्रणाली पोवार,आराध्या पोतदार, अमृता पोतदार, समृद्धी जाधव, रिया संकपाळ, क्षितिजा जाधव, अप्रमेय जाधव,आदि मान्यवर उपस्थित होते.
By: Yuvraj Ramchandra Yedure