YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

विवेकी समाजासाठी साहित्य आणि कला

  • Home
  • विवेकी समाजासाठी साहित्य आणि कला
विवेकी समाजासाठी साहित्य आणि कला

विवेकी समाजासाठी साहित्य आणि कला

विवेकी समाजासाठी साहित्य आणि कला
माणसाला निसर्गाकडून ज्या गोष्टी मिळतात, त्यावर माणूस आपल्या सृजनशीलतेच्या सहाय्याने प्रक्रिया, संस्कार करतो. या संस्कारांमधून निर्माण होणारे विचार, चालीरीती, पद्धती म्हणजेच माणसाची संस्कृती. प्रत्‍येक व्‍यक्‍तीची संस्‍कृती ही दुसर्‍या व्‍यक्‍तीच्‍या संस्‍कृतीहून काही प्रमाणात का होईना वेगळी आणि स्‍वतंत्र असते. संस्कृती ही अनेक वर्षांच्या प्रक्रियेनंतर तयार होते. त्यामुळे समान भूभाग, निसर्ग असलेल्या व्यक्तींची संस्कृती सारखी असते. माणसाच्या भावविश्वाचा पाया असते ती संस्कृती. आणि या संस्कृतीला पाया असतो तो म्हणजे साहित्य आणि कला आविष्कार.

समाजात असलेल्या कला, साहित्य, चित्रपट किंवा कोणतेही इतर कला प्रकार घ्या; ते माणसाच्या भावविश्वाचा आरसा असतात. हे कलाप्रकार समाजाचं मन तयार करतात, प्रेरणा जागृत ठेवतात. समाजाचे संस्कार आणि शहाणपण तपासत राहतात. आपला मराठी समाज जर सर्जनशील आणि विवेकी घडावा असं वाटत असेल तर विविध कला आणि साहित्य यांकडे विशेष लक्ष पुरवणे आपल्याला गरजेचे आहे. हे काम केवळ सरकारी अनुदान देऊन होणारे नाही. हा विचार प्रत्येक मराठी मनामध्ये रुजायला हवा. तरच आपण विवेकी समाजाकडे वाटचाल करू शकू.

आपला नम्र
युवराज येडूरे 
राधानगरी विधानसभा मतदारसंघ

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs