मनसेने दिला जाधव कुटुंबाच्या चिमुरड्यांना आधार
कसबा तारळे येथे आईचा झालेला खून तसेच चार वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने वडिलांचे , तर आजोबांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाल्याने निराधार झालेल्या दोन मुली , मुलगा तसेच वयोवृद्ध आजी या चार वर्षांपूर्वी सुखासुखी जीवन जगणाऱ्या जाधव कुटुंबाला आता समाजाच्या मायेची , आधाराची गरज आहे . अशी बातमी लोकमत समुदायाने बातमी प्रसिद्ध केले होती त्या माहितीचा आढावा मनसे युवा नेते युवराज येडुरे यांनी दखल घेतली व त्यांच्या समोर ही माहिती मिळाली ती अशी कॅन्सरने निधन झाले व सासऱ्यापाठोपाठ नवऱ्याच्या निधनामुळे एकाकी पडलेल्या कविताने संकटांना धीराने सामोरे जात टेलरिंग व्यवसाय करत कुटुंब सांभाळले . थोरली मुलगी गीताला डी फार्मसीला घातले . दुसरी मुलगी श्रुती दहावीत , तर मुलगा साहिल पाचवीत शिक्षण घेत आहे . कविताच्या अचानक जाण्याने तीन मुले , सासू एकाकी पडली आहेत . त्यांना या घटनेचा जबर धक्का बसला आहे . या माहितीचा आढावा राधानगरी तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिकांनी घेतली आज त्यांना भेटण्यासाठी मनसेचे गटनेते युवराज येडूरे गेले असता ही तिन्ही मुले आजीच्या कुशीत कावरीबावरी होऊन बसली होती . आणि या कुटुंबाला खरंच आदराची गरजेचे आहे,याची जाणीव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना व महाराष्ट्र सैनिकांना झाली व तात्काळ मनसेच्या वतीने त्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचं ठरवलं व जाधव कुटुंबाला प्रत्येकी व्यक्तिशः दोन लाखाचा अपघाती विमा तसेच मुलगी श्रुती दहावी , तर मुलगा साहिल पाचवी यांची शैक्षणिक व पालनपोषणाची जबाबदारी मनसेने घेतली . तसेच त्या घराचा संरक्षण म्हणून दोन लाखाचा विमा दिला, त्याचबरोबर दिवाळी चा बाजार पूर्णपणे त्यांना भरून दिला. याप्रसंगी युवराज येडुरे म्हणाले या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जाधव कुटुंबाला खरोखरच गरज आहे, आणि ही मदत आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना मिळावी ज्या लोकांना जाधव कुटुंबियांना मदत करायचे आहे अशा सर्वांनी त्यांच्याशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संपर्क साधावा जेणेकरून ते कुटुंब पुन्हा एकदा उभा करून अनाथ झालेल्या मुलांना त्यांना आधार देऊया तुमच्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना जर आधार मिळाला तर नक्कीच ते पुन्हा उभा राहू शकतात आज ती मुले घाबरले आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे घटना घडल्यापासून आतापर्यंत त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचलेलं नाही आम्ही प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्या ठिकाणी पोचून त्यांना आधार दिला व व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभा आहे असे त्यांनी सांगितलेला आहे, मनसेच्या माध्यमातून ज्यांना जी काही मदत आमच्या माध्यमातून करता येत होती तितकी मदत आम्ही त्यांना केलेली आहे, पुन्हा एकदा आम्ही तुम्हा सर्वांना आवाहन करतोय की तुम्ही देखील त्यांना मदत करा हीच विनंती मनसेच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी मनसेचे राधानगरी शहर अध्यक्ष राजेश पाटील, राधातालुका उपाध्यक्ष उत्तम चव्हाण, रणजित पाटील(सरवडे), प्रविण मनुगडे, रणजित पाटील, राहुल कुंभार, शहाजी कुंभार, वृषभ आमते,रोहित कानकेकर,अक्षय पोवार, अशोक कांबळे( सरपंच), जीवन कांबळे(सर), शांताबाई कांबळे (CPO), चंद्रकांत प्रभु (सामाजिक कार्यकर्ते ) उपस्थित होते
By: Yuvraj Ramchandra Yedure