YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक! मनसेला उभारी, फयेत उघडलं खातं (भुदरगड तालुक्यातील फये या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक निकाल)

  • Home
  • भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक! मनसेला उभारी, फयेत उघडलं खातं (भुदरगड तालुक्यातील फये या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक निकाल)
भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक! मनसेला उभारी, फयेत उघडलं खातं (भुदरगड तालुक्यातील फये या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक निकाल)

भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक! मनसेला उभारी, फयेत उघडलं खातं (भुदरगड तालुक्यातील फये या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक निकाल)

भुदरगड तालुक्यातील फये ग्रामपंचायतीची निवडणूक अपेक्षेप्रमाणे गाजली,अत्यंत चूरशीने झालेल्या लढतीत भाजपा- शिवसेना प्रणित सातेरीदेवी शेतकरी विकास आघाडीच्या नकुताई सात्ताप्पा धुरे या थेट सरपंच पदासाठी विजयी झाल्या,व या आघाडीस सातपैकी तीन जागा तर विरोधी मनसे,राष्ट्रवादी प्रणित सातेरीदेवी ग्रामविकास आघाडीस चार जागा मिळाल्या.आज झालेल्या मतमोजणीत समसमान जागा निवडून आल्या आहेत.

भुदरगड तालुक्यातील फये या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक काल झाली,काल मतदान झालेनंतर काल सकाळी मतमोजणी झाली,त्यात सरपंच पदासाठी अत्यंत चूरशीने निवडणूक झाली,विजयी नकुताई सात्ताप्पा धुरे यांना ४४६ मते,तर जयश्री विष्णू केसरकर यांना ४३१ मते मिळाली, सातेरी देवी शेतकरी आघाडीचे नेतृत्व अंकुश पाटील,लक्ष्मण राऊळ यांनी केले तर सातेरीदेवी ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व विष्णू केसरकर, विठ्ठल पाटील यांनी केले.विजयानंतर दोन्ही आघाडीने फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण केली. आज मतमोजणीत निवडून आलेले उमेदवार प्रभाग १- अनुसया शिवाजी कांबळे, अश्विनी लक्ष्मण पाटील,सुषमा संतोष पाटील प्रभाग२-नामदेव तुकाराम गुरव, अनुश्री मारुती केसरकर प्रभाग ३- सुरेश दिनकर डांगे, आक्काताई सुरेश धुरे

 
या वेळी मनसेचे नेते युवराज येडूरे म्हणाले, भुदरगड तालुक्यातील  येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ताकतीने निवडणुका लढवणार असून परिपूर्ण नवनिर्माण विकास पद्धत आपण ग्रामीण ग्रामपंचायत मध्ये काम करण्यासाठी महाराष्ट्र सैनिक यांना मार्गदर्शन करणार. यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी सज्ज व्हावे.

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Events