YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

राधानगरी विधानसभा मतदारसंघात वेळीच आवरणं गरजेचं आहे, कारण आपल्या मतदारसंघाची ओळख वेगळी आहे . म्हणूनच , आपण आपल्या कार्यकर्त्यांचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.

  • Home
  • राधानगरी विधानसभा मतदारसंघात वेळीच आवरणं गरजेचं आहे, कारण आपल्या मतदारसंघाची ओळख वेगळी आहे . म्हणूनच , आपण आपल्या कार्यकर्त्यांचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.
राधानगरी विधानसभा मतदारसंघात वेळीच आवरणं गरजेचं आहे, कारण आपल्या मतदारसंघाची ओळख वेगळी आहे . म्हणूनच , आपण आपल्या कार्यकर्त्यांचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.

राधानगरी विधानसभा मतदारसंघात वेळीच आवरणं गरजेचं आहे, कारण आपल्या मतदारसंघाची ओळख वेगळी आहे . म्हणूनच , आपण आपल्या कार्यकर्त्यांचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.

कोणीतरी आपला कार्यकर्ताने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन धामोडे येथील व्यक्तीला फोनवरून धमकी दिलेल्याचे कॉल रेकॉर्ड आमच्या निदर्शनास आले आहे . असे अनेक कॉल रेकॉर्ड आपल्या कार्यकर्त्यांच्या कडून राधानगरी विधानसभा मतदारसंघातील अनेक नागरिकांना धमकावत आले आहे, व याच्या ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत पोहोचले आहेत, आणि यामध्ये घोडा लावणे तसेच संपवण्याची भाषा व  घाणेरडी भाषा सतत वापरताना दिसत आहे, त्याला मतदारसंघाच्या संस्कृतीत जागा नाही . त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो .

राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या ज्यांनी आपल्याला मतं दिली त्याच लोकांना अशा प्रकारची वागणूक आणि धमकीच्या माध्यमातून त्यांना घाबरण्याचा प्रयत्न आपले निष्ठावंत कार्यकर्ते करत आहेत,  त्या भावेनं हे कॉलवर धमकवणे हे साफ गैर आहे . विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो . एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो , त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो .. तशा टीका राधानगरी विधानसभा मतदारसंघात नव्या नाहीत ... !  आमचे तुमच्याबद्दल मतभेद जरूर आहेत आणि रहातील , परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे , ही सुशिक्षित मतदार संघाची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे . असं कॉल वरती धमकवणे ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे , तिला वेळीच आवर घालायला पाहिजे .

चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरूषांनी , संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं ! कोणीही ह्या मतदारसंघाची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा ! कॉल करणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आपला कार्यकर्ता आहे या माध्यमातून आपले विचार व आपली भाषण करण्याची शैली काय आहे आणि  आपल्या कार्यकर्त्यांकडून येणाऱ्या अश्लीश भाषा यातून लोकांनी काय बोध घ्यायचा हे प्रश्न ? आहे की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे ! कारण ह्या अशाच आपल्या कार्यकर्त्यांमुळे चार - दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण होतो , समाज दुभंगतो . द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता मतदार संघातील नागरिकांना समजलं असेलच . हे सगळं राधानगरी विधानसभा मतदारसंघात वेळीच आवरणं गरजेचं आहे, कारण आपल्या मतदारसंघाची ओळख वेगळी आहे . म्हणूनच , आपण आपल्या कार्यकर्त्यांचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा. 

आपल्याला माझं एकच सांगणं आहे ; मतदारसंघातील नागरिकांचा सहनशीलतेचा अंत पाहू नका . सत्ता येत जात असते . कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही . आ. प्रकाशराव आंबिटकर , तुम्हीही नाही !

आपला नम्र
युवराज येडूरे 
राधानगरी विधानसभा मतदारसंघ
www.yuvrajyedure.com

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs