YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते.

  • Home
  • प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते.
प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते.

प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते.

प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते.

एखादी व्यक्ती एकाच बाजूने, फक्त आपणच कसे बरोबर, हेच लक्षात ठेवून विचार करणारी असते.

समोरची व्यक्ती ही बरोबर असू शकते हे त्यांना पटतच नाही आणि पटवून घ्यायचंही नसतं.

फक्त आपल्या मुद्द्यावर अडून राहून, नाण्याला दुसरी बाजूही असू शकते, हा विचार अशा व्यक्तींच्या डोक्यात शिरतच नाही.

जी व्यक्ती दोन्ही बाजू लक्षात घेऊन, सारासार विचार करणारी असते, ती व्यक्ती समोरच्या चुकीचा विचार करणाऱ्या व्यक्तीला आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करत असते, त्या वेळी समोरची व्यक्तीची विचार करायची पद्धत मर्यादित असल्याने, ती व्यक्ती काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते.

अशावेळी दोन्ही बाजूने सारासार विचार करणाऱ्या व्यक्तीने जास्त स्पष्टीकरण देत न बसता, त्या समोरच्या एकतर्फी विचार करणाऱ्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं. आणि तो विषय सोडून, जिथे पटतं, त्याच विषयावर बोलावं.

अशा व्यक्तीबरोबर बोलून वाद होण्यापेक्षा त्यांच्याशी न बोलणं हाच शहाणपणा! कामापुरतं बोलावं!

अशा व्यक्तींना कधी ना कधी त्यांची चूक कळून येतेच!

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs