YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

मनसे पक्षाची राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सभासद नोंदणी जनजागृती रॅली

  • Home
  • मनसे पक्षाची राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सभासद नोंदणी जनजागृती रॅली
मनसे पक्षाची राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सभासद नोंदणी जनजागृती रॅली

मनसे पक्षाची राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सभासद नोंदणी जनजागृती रॅली

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्राथमिक सभासद नोंदणी मंगळवार दिनांक 6/ 9/ 2022 रोजी ठीक दहा वाजता राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, राधानगरी विधानसभा मनसे गट मिळते युवराज येडुरे यांच्या शुभहस्ते शुभारंभ करून जनजागृती बाईक रॅली काढून  राज ठाकरे यांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी करणार आहेत.

यासंदर्भात माहिती देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे गटनेते युवराज येडूरे म्हणाले मनसे कोल्हापूर संपर्क अध्यक्ष जयराज दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद नोंदणी जनजागृतीच्या माध्यमातून राजसाहेब ठाकरे यांचे विचार लोकांपर्यंत रुजवण्याचे काम राधानगरी विधानसभा मतदारसंघातील कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले, राधानगरी तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, भुदरगड तालुका अध्यक्ष विक्रम आरडे, आजरा तालुकाध्यक्ष अनिल निऊगरे, अशोक पाटील, राजेंद्र पाटील, धनंजय देसाई, महेश देसाई, अमित कोरे, सागर शेळके,प्रवीण मानगुडे, रंणजीत पाटील,व  महाराष्ट्र सैनिक यांच्या सर्वांच्या सहकार्याने सभासद व नोंदणीचे नियोजन केले आहे , सध्या निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाला दोन ते अडीच वर्षानंतर सदस्य नोंदणी करावी लागते त्यानुसार ही नोंदणी होत आहे, तसेच जे सदस्य होणार आहेत त्या सदस्याला प्रत्येक आठवड्यात काहीतरी नवीन गोष्ट पक्षाकडून त्यांच्या मोबाईलवर जाणार आहे. त्यामध्ये राजसाहेब ठाकरे यांचे भाषणं असतील. महाराष्ट्रासंबंधी काही विषय असतील अशा गोष्टी त्यामध्ये असतील, या सदस्य नोंदणीमध्ये मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी व्हावं. असे आव्हान युवराज येडूरे यांनी केले.

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs