निपाणी - राधानगरी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी मनसेचे रस्ता रोको आंदोलन
(अपघाताला कारणीभूत ठरत असलेल्या रस्त्यावर रस्ता रोको करत, निषेध)
राधानगरी : गेली चार वर्ष निपाणी - राधानगरी महामार्गावरील रोड अपघाती कोणत्याही शासनाच्या अधीन राहून झाला नसल्याने येथील नागरिक त्रस्त असून,अपघाताला कारणीभूत ठरणार्या रस्त्या वरील खड्डयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अधिकाऱ्यांना खाली डोकं वर पाय करुन आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, राधानगरी विधानसभा मतदारसंघाची गटनेते युवराज येडूरे, राधानगरी तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, राधानगरी शहराध्यक्ष राजेश पाटील,राधानगरी उपाध्यक्ष उत्तम चव्हाण, मोहन निर्मळे, ऋषभ आमते, प्रवीण मनुगडे, सागर शेळके, रंणजीत पाटील, अमित कोरे, सौरभ कांबळे,राहुल कुंभार, आदि सहभागी झाले होते.
निपाणी - राधानगरी महामार्गाचे अत्यंद दर्जेदार पध्दतीने काम करण्यात यावे मात्र निपाणी - राधानगरी रस्ते महेंद्रसिंग कंपनीने चार वर्षे झाली तरी बनवला नाही. यामुळे रस्ता तसाच पडून राहिल्याने पावसाने रस्त्याचे अजून दुरावस्था झाली आहे.नादुरुस्त रस्त्याचे अंतर मोठे असून, या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे.तर स्थानिक नागरिकांना या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या प्रकरणी राष्ट्रीय महामार्गाचे अधिक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले होते,तरी या संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला आहे.येत्या दोन दिवसात सदर रस्त्याचे काम हाती न घेतल्यास कोणतीही पुर्वसूचना न देता बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये बसू देणार नाही असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला.
By: Yuvraj Ramchandra Yedure