YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

कलाकार माणूस कधीच मरत नाही..

  • Home
  • कलाकार माणूस कधीच मरत नाही..
कलाकार माणूस कधीच मरत नाही..

कलाकार माणूस कधीच मरत नाही..

कलाकार माणूस कधीच मरत नाही..

कारण त्यांनी जी कलाकृती बनवलेली असेल ती कलाकृती पुढील दिशा देणारी पेरणा देणारी असते.

माझे वडील कै. रामचंद्र दत्तात्रय येडूरे हे एक काष्ठ शिल्प कलाकार म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परिचित होते त्यांनी अनेक काष्ठशिल्प आपल्या हातून बनवलेले आहेत त्याचे आज मुरगूड येथे शिवजयंती निमित्त प्रदर्शनासाठी ठेवले आहेत .आज वडील जरी नसले तरी त्यांनी बनवलेल्या कलाकृती नागरिकांना पाहायला मिळते हे पाहून खूप समाधान वाटलं आज माणूस नसला तरी त्याच्या पाठी मागच्या आठवणी त्यांनी केलेले कार्य हे पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी असतं हे पुन्हा एकदा वडिलांच्या माध्यमातून सिद्ध झाले.

आज वडिलांची खूपच आठवण आली..

कारण त्यांनी केलेल्या कलाकृती ची वा... वा... आज लोकं करत होती पाहत होती ती किती सुंदर कलाकृती बनवली आहे असे शब्द माझ्या कानावर येते होते हे सर्व पाहून मी खूपच भावुक झालो...

शिव स्वराज्य प्रतिष्ठान चे मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी अशा प्रकारच्या कलाकृतींना समाजापुढे आणून त्याचे प्रदर्शन भरवले याबद्दल मी त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यानां शुभेच्छा दिल्या.

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs