शेणगाव च्या राज्यस्तरीय सोंगी भजन स्पर्धेत आनूर च्या श्री संतश्रेष्ट तुकाराम महाराज भजनी मंडळाचा प्रथम क्रमांक
भुदरगड तालुक्यातील शेणगांवच्या राज्यस्तरीय सोंगी भजन स्पर्धेत आनूर ता कागलच्या श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संगित सोंगी भजनाने प्रथंम क्रमांक मनसेचे युवानेते युवराज येडूरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले यावेळी निकालाची जाहिर माहिती या नवरात्रऊत्सव सोंगी भजन स्पर्धेचे कार्याध्यक्ष माणसिंग तोरसे यांनी आज येथील ज्ञानेश्वर रंगमंचावर आज दुपारी निकाला जाहीर केला.
उपसरपंच मंगल कांबळे या निकाल सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी उपस्थीत कलाकार व शौकिन ग्रामस्थांनी या विजयाप्रित्यर्थ आनंदाने जल्लोश केला.अपार मेहनत घेवून सादर केलेल्या लोककलेचे आणि कला सादर करणाऱ्या कलाकारांचे चीज झाले असल्याची भावना या विजेत्यांनी याप्रसंगी बोलून दाखवली.
या स्पर्धेत विठ्ठलपंथी संगित सोंगी भजनी मंडळ दुर्गुळवाडी ता करवीर यांनी दुसरा क्रमांक मिळवला तर तिसरा क्रमांक सद्गुरू संगित सोंगी भजनी मंडळ कंदलगांव ता करवीर यांनी प्राप्त केला.चौथा क्रमांक आधुनिक संगित सोंगी भजनी मंडळ सावर्डे बु ता कागल यांना व माऊली सोंगी भजनी मंडळ नवले या दोनही भजनी मंडळांना समान गुणांकामूळे देण्यात आला.
वैयक्तीक बक्षिसामध्ये फत्कृष्ट संगित संच आनूर ता कागल, उत्कृष्ट दिग्ददर्शन दुर्गुळवाडी ता करवीर, ढोलकीपट्टू आंबाजी कांबळे वाटंगी, उत्कृृ्ट नृत्य सचिन सुतार सावर्डे ता कागल, उत्कृष्ट गायन आनूर ता कागल, उत्कृष्ट पुरूष कलाकार शिवाजी खाडे कंदलगांव ता करवीर, उत्कृष्ट भटजी संतोष सुतार नवले,उत्कृष्ट स्त्री कलाकार संदिप माने आटेगाव ता राधानगरी, उत्कृष्ट सोंगासाठी भुजवडे च्या मल्हार व स्वामी समर्थ सोंग सोळांकूर या सोंगाला मिळाला.
विजेत्या भजनी स्पर्धकांना रोख रक्कम, कायम शिल्ड देण्यात आले.दरम्यान या सर्व भजनी मंडळांच्या कलाकारांनी या भजन कलवंतांना शासनाचे पाठबळ मिळावे व उत्तोरोत्तर लोककलेचा हा प्रकार वाढत जावा अशी सदिच्छा व्यक्त केली.
प्रत़्येक विजेत्या कलाकरांना चांदीची फ्रेम मुर्ती, चषक व रोख रक्कम मांन्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी सरपंच सुरेश नाईक माजी उपसरपंच देवराज बारदेसकर, मनसेचे युवा नेते युवराज येडूरे, ग्रा प सदस्य दिनकर कांबळे, सदस्या संगिता तोरसे, अपर्णा कदम व सर्व ग्रा प सदस्य, अजित चोडणकर, प्रभाकर देसाआ, रविंद्र एकल, पोलीस पाटील विजय साळोखे, नाना नागरपोळे, यशवंत पाटील, अनिल कोरगावकरसूत्रसंचालन राजेंद्र शिंदे परिक्षक पंडितराव सोळोखे, सुनिल कोरे, शिवाजी पोवार, सुधीर सुतार, दत्तात्रय साळोखे, ज्ञानदेव आमणगी, जेष्ट कार्यकर्ते ज्ञानदेव मुंगळे, आदि अनेक मांन्यवर उपस्थीत होते.आदि मांन्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.By: Yuvraj Ramchandra Yedure