YUVRAJ RAMCHANDRA YEDURE

"उद्योजकता म्हणजे फक्त एखादा व्यवसाय सुरु करणे नव्हे तर त्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेणे:युवराज येडूरे

  • Home
  • "उद्योजकता म्हणजे फक्त एखादा व्यवसाय सुरु करणे नव्हे तर त्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेणे:युवराज येडूरे

"उद्योजकता म्हणजे फक्त एखादा व्यवसाय सुरु करणे नव्हे तर त्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेणे:युवराज येडूरे

 "उद्योजकता म्हणजे फक्त एखादा व्यवसाय सुरु करणे नव्हे तर त्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेणे:युवराज येडूरे

उद्योजकता म्हणजे फक्त एखादा व्यवसाय सुरु करणे नव्हे तर त्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेणे. बहुतेकांचं व्यवसायाप्रती असलेलं आकर्षण हे त्यातील श्रीमंतीमुळे असतं, पण खऱ्या उद्योजकाला त्यातल्या पैशापेक्षा त्यातून मिळणाऱ्या समाधानाची जास्त आस असते. 

पैसा सगळीकडेच आहे. जगातल्या मोठमोठ्या कंपन्यांचे सगळ्यात मोठे नोकर म्हणजे CEO हे काही शे कोटींमधे पगार मिळवतात. कित्येक उद्योजकांना ते आपल्या उभ्या आयुष्यातही शक्य होत नाही. पण म्हणून त्यांना आपल्या व्यवसायात काही कमी जाणवत नाही, किंवा त्यांना त्या नोकरीच आकर्षण वाटत नाही. 

स्वतःच्या विचाराने पुढे जाणे, आपले कौशल्य पणाला लावणे, धोका पत्करणे, अशक्य गोष्टींनाही शक्य करण्यासाठी प्रयत्न करणे, बहुतेकांसाठी ज्या गोष्टी स्वप्नातही शक्य नसतात त्या प्रत्यक्षात मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, स्वप्न पाहणे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, आशा-निराशा यश-अपयश संकट-समाधान न्याय-अन्याय योग्य-अयोग्य अशा सगळ्या गोष्टींना मनाची कोणतीही चलबिचल न होऊ देता एकसारख्याच विचाराने आणि धैर्याने सामोरे जाण्याची जिद्द असणे, कोण म्हणत शक्य नाही असं प्रश्न स्वतःलाच विचारने, हा प्रश्न विचारताना स्वतःच्याच क्षमतेला आव्हान देणे अशा अनेक गोष्टींमधून उद्योजक घडत असतो. 

उद्योजकता हे एक झपाटलेपण आहे. खऱ्या उद्योजकाला व्यवसायाशिवाय करमत नाही, तो त्यातच रमतो, तो त्यातच आपले आयुष्य खर्ची घालतो, त्यासाठीच आपले सर्वस्व पणाला लावतो, तो त्याच्याशिवाय स्वतःच्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही... उद्योजक हा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत उद्योजकच असतो, तो कधीही रिटायर होत नाही... 

उद्योजकता हे व्यसन आहे, आणि हे व्यसन ज्याला जडतं त्याच आयुष्य एखाद्या पुस्तकासारखंच बनून जातं... अगदी संग्रही ठेवावं असं... कधीही नजरेसमोरून ढळू देऊ नये असं... त्यातलं कोणतंही पान कधीही वाचायला सुरुवात केली तरी नेहमीच काहीतरी नवीन शिकल्याचा आनंद मिळेल असं...  

उठा जागे व्हा उद्योजक बना...
समृद्ध व्हा...

By: Yuvraj Ramchandra Yedure


Latest Blogs